शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांनी ठरवल्यासच दहशतवादाचा नायनाट

By admin | Updated: January 13, 2015 04:55 IST

भारत व इंडोनेशिया हे दोन्ही मुस्लिमबहुल देश असून, या देशांतील मुस्लिमांनी निश्चय केला तरच जगातील दहशतवादाचा नायनाट होऊ शकेल

नाशिक : भारत व इंडोनेशिया हे दोन्ही मुस्लिमबहुल देश असून, या देशांतील मुस्लिमांनी निश्चय केला तरच जगातील दहशतवादाचा नायनाट होऊ शकेल, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी येथे ‘वेणुनाद’ या विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना केले.ते म्हणाले, सध्या दहशतवादामुळे सगळे जग त्रस्त आहे. पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ल्याविरोधात हजारो लोक जमले होते. दहशतवाद समूळ नष्ट करायचा असल्यास भारत व इंडोनेशिया या दोन मुस्लिमबहुल देशांतील मुस्लिमांना तसा निश्चय करायला हवा. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणावर चिंता व्यक्त करीत केंद्र व राज्यातील नवे सरकार नद्यांच्या स्वच्छतेत पुढाकार घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संगीत, साहित्य, आयुर्वेद या बाबी म्हणजेच भारतीय संस्कृती असून, तरुणाईने देशाच्या संस्कृतीचा सन्मान न केल्यास भारत नष्ट होईल, असे ते म्हणाले.देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आल्यानंतर हिंदुत्वाचे प्रस्थ वाढते आहे का, या प्रश्नावर रविशंकर यांनी केंद्र सरकारची पाठराखण केली. ते म्हणाले, हिंदुत्ववादी नेते आधीही होते आणि आताही आहेत. त्यांच्याशी केंद्र सरकारचे काही देणेघेणे नाही. अध्यात्मातूनच राजकारणाची स्वच्छता होऊ शकेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (प्रतिनिधी)