शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंनी पदाचा गैरवापर केला का, याचीही चौकशी होणार

By admin | Updated: June 24, 2016 05:17 IST

भोसरी, जि.पुणे येथील एमआयडीसीमधील जमिनीच्या खरेदी व्यवहारात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला का, याची चौकशी करण्यात येणार आहे.

मुंबई : भोसरी, जि.पुणे येथील एमआयडीसीमधील जमिनीच्या खरेदी व्यवहारात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला का, याची चौकशी करण्यात येणार आहे. या जमीन व्यवहाराची न्यायालयीन चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती डी.एस. झोटिंग करणार आहेत. त्यांच्या चौकशीची कार्यकक्षा निश्चित करणारा आदेश आज सामान्य प्रशासन विभागाने काढला. या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का, ही जमीन एमआयडीसी कायदा वा महसूलविषयक विविध अधिनियमान्वये हस्तांतरणीय किंवा विक्री पात्र होती का, याची चौकशी करण्यात येईल, तसेच खडसे यांनी मंत्रिपदाचा वापर या जमीन खरेदी व्यवहारात केला काय (कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट), याचीही चौकशी केली जाईल. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी ही जमीन खरेदी केली होती. ती एमआयडीसीच्या मालकीची असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आधीच म्हटले आहे. तथापि, ही जमीन मूळ मालकाकडेच होती आणि त्याच्याशी खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला होता, असे खडसे यांचे म्हणणे आहे. खडसे यांच्या या जमीन खरेदी गैरव्यवहारातील सहभागाबद्दल बातम्या प्रसारित झाल्याने, ही न्यायालयीन चौकशी करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. न्या.झोटिंग तीन महिन्यांत आपला अहवाल शासनाला सादर करतील. (विशेष प्रतिनिधी) हा तर दबाव टाकण्याचा प्रकार - राष्ट्रवादीजमीन घोटाळ्यात अडकलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे पुण्यातील भाषणात क्लीनचिट दिली आहे. आधी क्लीनचिट द्यायची आणि नंतर निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशीचे आदेश द्यायचे, हा प्रकार चौकशी यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. खडसेंची चौकशी कमिनशर आॅफ एन्क्वायरी अ‍ॅक्टनुसार झाली पाहिजे, तसेच सर्व आरोपांची एकत्रित चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. या सरकारमधील ११ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे सांगत त्यात ९ भाजपाच्या व २ शिवसेनेच्या मंत्र्यांचा समावेश आहे, असे म्हणाले.