शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘जेईई’त कल्पित देशात तर नाशिकची वृंदा मुलींमध्ये प्रथम

By admin | Updated: April 28, 2017 03:04 IST

देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण

नवी दिल्ली/नाशिक : देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या ‘जेईई-मेन-२०१७’ या परीक्षेत ३६० पैकी ३६० गुण मिळवून उदयपूरचा कल्पित वीरवाल संपूर्ण देशात पहिला आला तर मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकाविण्याचा मान नाशिकच्या वृंदा नंदकुमार राठी हिने मिळविला. ३२१ गुण मिळविणारी वृंदा गुणानुक्रमे देशात ७१ वी ठरली.गेल्या ५८ वर्षांत आयआयटीच्या या अत्यंत कठीण अशा प्रवेश परीक्षेत महाराष्ट्रातील एकही मुलगी देशात पहिली आली नव्हती. ते वृंदाने करून दाखविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.संपूर्ण देशात विष्णू जैन व अनन्ये अगरवाल हे परीक्षार्थी अनुक्रमे दुसरे व तिसरे आले. या दोघांनाही प्रत्येकी ३५० गुण मिळाले. प्रत्यक्ष प्रवेश मिळविण्याची ही पहिली पायरी आहे. यानंतर ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’ ही अंतिम परीक्षा होईल व त्यातील गुणवत्ता यादीनुसार प्रवेश होतील. सीबीएसईने त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ‘जेईई-मेन’ परीक्षेला बसलेल्या एकूण ११ लाख ८६ हजार ४५४ विद्यार्थ्यांपैकी दोन लाख २१ हजार ४२७ ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’साठी पात्र ठरले. यात १.७५ लाख मुले तर ४६,१६० मुली आहेत. अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षा २१ मे रोजी व्हायची आहे. यातून अंतिमत: १३ हजारजागांवर प्रवेश दिले जातील.देशात पहिल्या आलेल्या कल्पितचे वडील पुष्करलाल हे सरकारी इस्पितळात कम्पाऊंडर आहेत तर त्याची आई शाळेत शिक्षिका आहे. कल्पितने ही परीक्षा डोळ््यापुढे ठेवून इयत्ता आठवीपासूनच खासगी क्लास लावला होता. अजून नक्की ठरविले नसले तरी मुंबई आयआयटीत कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळविण्याची त्याची इच्छा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

वृंदाला करायचंय संशोधन-वृंदा राठी नाशिकच्या सेंट झेवियर्स हायस्कूलची असून तिने शालान्त परीक्षेत ९४ टक्के गुण मिळविले होते. जेईईसाठी क्लास लावला होता. आयआयटीमधून संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची तिचा इच्छा आहे. वृंदाचे वडील प्रॉडक्शन इंजिनीअर असून सिन्नर येथे त्यांचा लघुउद्योग आहे. तिची आई कृष्णा आर्किटेक्ट आहे.वृंदाच्या यशामुळे आमची मान उंचावली. पहिल्या शंभरमध्ये येईल, असे वाटले होते. पण तिने त्याहूनही उत्तुंग भरारी मारली. याचा नाशिककरांनाही अभिमान आहे. - नंदकुमार राठी, वृंदाचे वडील