शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘मैने गलत किया हो तो मुङो बददुआएं लगे’

By admin | Updated: August 3, 2014 02:29 IST

पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद करणा:या मॉडेलने महिनाभर आधीच पारसकर यांना ‘एक्स्पोझ’ करण्याची धमकी दिली होती.

डिप्पी वांकाणी - मुंबई
पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद करणा:या मॉडेलने महिनाभर आधीच पारसकर यांना ‘एक्स्पोझ’ करण्याची धमकी दिली होती. पण पारसकर यांनी तिच्या सर्व आरोपांचा इन्कार करत तिने केलेले आरोप कोणीही सिद्ध केले तर ती सांगेल ती शिक्षा भोगण्याची तयारी दर्शविली होती, अशी माहिती आता उघड झाली आहे.
फिर्याद दाखल होण्याच्या एक महिना आधी म्हणजे 27 जून रोजी पारसकर आणि या मॉडेलने परस्परांना पाठविलेल्या ई-मेलवरून ही माहिती मिळते. ‘लोकमत’ने हे ई-मेल मिळविले असून या प्रकरणाची पूर्वपीठिका वाचकांना कळावी म्हणून आम्ही ते संक्षेपाने येथे देत आहोत. 
जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीच्या वेळी पारसकर यांच्या वकिलाने काही ई-मेल मिळवायचे आहेत, असे सांगून वेळ मागितला होता व त्यामुळे न्यायालयाने 5 ऑगस्टर्पयतचा वेळ देत तोर्पयत पारसकर यांना अटक न करण्याचा अंतरिम आदेश दिला होता.
27 जूनला झालेली ई-मेलची देवाणघेवाण थोडक्यात अशी -
सकाळी 9.38, मॉडेलकडून पारसकरना
‘माझी केस पुढे नेण्याआधी मला तुमची फक्त दहा मिनिटे हवी आहेत. माङयाकडून दयेची बिलकूल अपेक्षा ठेवू नका. तुम्ही माङयासोबत व 
माङया केससोबत जे काही केलेत ते तुम्ही मान्य करावे, पूनम पांडेला भेटून तुम्ही तिला माङो एसएमएस दाखविलेत व या स्थानबद्धता केसचा वाद उभा करण्यात तिला मदत केलीत हे तुम्ही 
कबूल करावे, एवढीच माझी अपेक्षा आहे.. 
आपण याआधी अनेक वेळा भेटलो त्या सीसीडी किंवा कोस्टा कॉफीमध्ये मला तुम्हाला भेटायचे नाही, तर तुम्ही डय़ुटीवर असताना मला तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये भेटायचे आहे.’
दु. 3.29 पारसकर यांच्याकडून मॉडेलला
‘हाय, तुझा शेवटचा मेल वाचताना आणि खासकरून त्यात तू माझा मित्र म्हणून केलेला उल्लेख वाचून खूप बरे वाटले. होय, लाडके तू कशाहीमुळे माङयाविरुद्ध गेलीस तरी तू माझी मैत्रीण होतीस, मैत्रीण आहेस व यापुढेही मैत्रीणच राहशील. माङयावर नोटीस बजावायला, माध्यमांसमोर जायला अथवा पोलीस आयुक्त अथवा इतर कोणाहीकडे जाऊन माङयाविरुद्ध तक्रार करायला तू मोकळी आहेस. कोणीतरी त्याच्या लाभासाठी सनसनाटी स्टोरी तयार करण्यासाठी तुझी दिशाभूल करीत आहे, असे मला वाटत असल्याने तू मला काहीही लिहिलेस तरी मला त्याचे जराही वाईट वाटत नाही.
होय, फिल्मी जगताशी जवळीक असलेल्या दुस:या कोणी (पोलीस) अधिका:याने तिला (पूनमला) पाठिंबा दिला असणो शक्य आहे, पण तो मी नाही हे पुन्हा एकदा शपथेवर सांगतो. काय व केव्हा घडले याची मला कल्पनाही नाही. पांडेच्या बाबतीत घडलेल्या घटनेच्या तारखेशी 
माङया पासपोर्टवरील नोंदी ताडून पाहिल्यास तर 26 एप्रिल ते 2 जूनर्पयत मी देशाबाहेर होतो हे तुला दिसून येईल.’
दु. 3.52 मॉडेलकडून पारसकरना
‘शप्पथ सांगते, माङो म्हणणो मी सिद्ध करून दाखवीनच आणि तुम्हाला सर्वासमोर उघडे पाडीन. मग, मी हे सर्व प्रसिद्धीसाठी करतेय, असे म्हणू नका. तुम्ही आणि पूनमच प्रसिद्धीसाठी मरत असता. तुमच्याकडून येणा:या प्रत्येक मेलने तुमचे खरे रंग उघड होत आहेत. काही वेळा तुम्ही मला भीती घालता, आता तुम्ही मला भावुक करू पाहत आहात. मी तुम्हाला ओळखून आहे. मी जरा जरी काही चूक केले असते तर कोणतेही स्पष्टीकरण न देता तुम्ही मला थेट जेलमध्ये टाकले असते. (आता) मीडिया भेटेल तेव्हा हे सर्व नाटक करा.’
दु. 4.12 पारसकर यांच्याकडून मॉडेलला
‘मी पूनम पांडेला ओळखत 
नाही, मी तिला आयुष्यात कधी पाहिलेले नाही किंवा तिच्याशी बोललेलेही नाही. मी तिला ओळखतो याचा एक तरी पुरावा दे, मग तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.’
मॉडेलकडून पारसकरना
‘तुम्हाला भेटले त्या दिवशी मी झोपू शकले नाही. माङया करिअरकडेही मला लक्ष देणो शक्य नाही. देवाशप्पथ सांगते, तुम्ही किती मोठे नाटकी आहात हे मी संपूर्ण जगाला दाखवून देईन. तुम्ही क्षमायाचना करता, पाटर्य़ा झोडता, व्हिडीओ शूटिंग करता, रात्रभर व्हॉट्सअॅपवर असता आणि आता अचानक सांगता की तुमची बायपास झालीय.’
सायं. 5.54 पारसकर यांच्याकडून मॉडेलला
‘कोणी तरी हरामखोर तुला चुकीची माहिती देतोय. माझा काही संबंध असल्याचे कोणीही दाखवून दिले तर कोणताही विचार न करता लगेच स्वत:हून तुङयासमक्ष कोणतीही शिक्षा भोगेन. ‘अगर मैने कभी भी आपके खिलाफ कुछ भी गलत किया हो तो आपकी माँ की सभी बददुआएं मुङो लगे. आपकी माँ की कसम.’ शपथेवर वगैरे तुझा विश्वास नाही हे मला माहीत आहे व बददुआएंवरही तुझा विश्वास नसावा, असे मला वाटते. मी भावुक होतोय आणि पोलीस अधिका:याने असे भावुक होणो चांगले नाही याची मला कल्पना आहे. पण लाडके, ज्याने तुङया आईची भावापासून सुटका करण्यापासून या एस्कॉर्ट केसर्पयत तुङयासाठी शक्यते सर्व केले तो मी पूनम पांडेची बाजू घेईन, असे तुला वाटावे याचेच मला दु:ख आहे.’