शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मनसेवाले गुंड तर मी पण अलाहाबादचा गुंड - काटजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 18:37 IST

असहाय्य कलाकारांना कशाला लक्ष्य करतात, तुमच्यात एवढीच हिम्मत असेल तर माझ्याकडे या तुमच्यासाठी माझा दंडुका तयार आहे. माझ्यासोबत 'दंगल' करा मग जगाला बघुद्या कोण किती मोठा गुंड

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती मार्कंडेय काटजू पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते गुंड आहेत असं ट्विट करत ते गुंड असतील तर मी सुद्धा अलाहाबादचा गुंड आहे. असहाय्य कलाकारांना कशाला लक्ष्य करतात, तुमच्यात एवढीच हिम्मत असेल तर माझ्याकडे या तुमच्यासाठी माझा दंडुका तयार आहे. माझ्यासोबत 'दंगल' करा मग जगाला बघुद्या कोण किती मोठा गुंड आहे'. असं ट्विट त्यांनी केलं आहे.
तुम्ही तरी अरबी समुद्राचं खारं पाणी प्यायला आहात पण मी तर संगम नदीचं पाणी प्यायलोय असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या मनसेला एकप्रकारे आव्हानंच दिलं आहे. पाक कलाकार असल्यामुळे 'ए दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची तंबी मनसेनी दिली आहे. त्या पार्श्वभुमीवर काटजू यांनी हे ट्विट केलं. 
 
 
 
 
दरम्यान,  ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.