शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

कधी मरण तर कधी यातना

By admin | Updated: May 4, 2016 21:34 IST

व्यंगचित्रात एक विचार, कला आणि व्यंग्य या त्रिमूर्तीचा समावेश असतो. अनेकदा एकटा व्यंगचित्रकारच समस्त समाज आणि वर्गाच्या हृदयाची तार छेडत असतो

व्यंगचित्रात एक विचार, कला आणि व्यंग्य या त्रिमूर्तीचा समावेश असतो. अनेकदा एकटा व्यंगचित्रकारच समस्त समाज आणि वर्गाच्या हृदयाची तार छेडत असतो. पूर्वी गुंफामध्ये राहणाऱ्या आणि तेथील भिंतीवर आपल्या कलेची छाप सोडणाऱ्या ग्रीक लोकांना व्यंगचित्राचे जनक मानले जात होते. परंतु वास्तविक दस्तऐवज लक्षात घेतले तर हा सन्मान १५९० मध्ये इटलीचे एनिबल आणि अगोस्तिनी कार्सी बंधूंनी ‘रित्रातिनी केरिची’ या नावाने जारी केलेल्या मालिकेला दिला जाऊ शकतो.युरोपमध्ये राजकीय उलथापालथ आणि परिवर्तनाच्या काळात व्यंगचित्रांनी आपले स्थान अधिक पक्के केले होते. साधारणपणे व्यंगचित्र हे स्वत:ला जगाचा शहेनशाह समजणाऱ्या हुकूमशहा आणि राजेरजवाडे यांच्यावरील सामान्य माणसाने केलेले भाष्य किंवा टिप्पणीच्या रूपात राहत असत. त्यावेळीदेखील व्यंगचित्रकारांना बहिष्कार, अटक आणि धमक्यांचा सामना करावा लागत असे. नाझी फॅसिस्टांविरुद्ध व्यंगचित्र बनविल्याबद्दल १९४४ मध्ये पोलँडच्या व्यंगचित्रकारांना मृत्युदंड देण्यात आला होता.१९७० मध्ये तुर्कीच्या हुकूमशाही सरकारने तत्कालीन व्यंगचित्रकार तुरहन सेलकुक यांनाही प्रचंड यातना दिल्या होत्या. अमेरिका-रशियादरम्यानच्या शीतयुद्धाने व्यंगचित्रकारांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. भारतात ब्रिटिश राजवट आपल्या शिखरावर असताना स्वदेशी व्यंगचित्रकारांची एक नवी पिढी जन्माला आली. दिवंगत शंकर पिल्लई हे भारतीय व्यंगचित्रांचे पितामह मानले जातात. त्यांच्यानंतरही अनेक श्रेष्ठ दर्जाचे व्यंगचित्रकार जन्माला आले आणि त्यांनी संपूर्ण देशाचे मनोरंजन आणि जनजागृती केली.क्षेत्रीय भाग आणि भाषांमध्येही व्यंगचित्रकार निर्माण झाले आणि ते हळूहळू समाजाचा आवाज बनले. आर.के. लक्ष्मण, काक, सुधीर तेलंग, रंगा, मारियो मिरांडा यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील व्यंगचित्रकारांचा दरारा होता. तर मराठी, तेलगू, तामीळ, बंगाली, गुजराती आणि पंजाबी यासारख्या समस्त प्रादेशिक भाषांमधील व्यंगचित्रकारांनी स्थानिक समस्यांसह आपली छाप सोडली. व्यंगचित्रकारांची ही लाट आता टीव्ही आणि इंटरनेटपासून तर सोशल मीडियापर्यंत पसरली आहे. हास्य, भाष्य आणि बोचरी टिप्पणी यासह सकाळच्या वेळी आमच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हा क्रम असाच सुरू राहील, अशी आशा आहे.