शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू तर पत्नीचा भूकबळी !

By admin | Updated: June 9, 2014 03:13 IST

पोटची मुले सोडून गेल्यानंतर आयुष्याची अखेर एकाकीपणे जगत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला.

नागपूर : पोटची मुले सोडून गेल्यानंतर आयुष्याची अखेर एकाकीपणे जगत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला. वृद्धाचा उष्माघाताने तर पत्नीचा भूकबळी गेला, असा पोलिसांचा संशय आहे. वृद्धेचा भूक आणि तहान असह्य होऊन मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर वसाहतीत ही घटना उघडकीस आली.रशीद मोहंमद नजीर मोहंमद (६२) आणि त्यांची पत्नी बिल्किस बानो रशीद मोहंमद (६१) असे या दुर्दैवी वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. ते गेल्या दोन-तीन महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहात होते. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात दुर्गंधी सुटल्याने शेजाऱ्यांनी शनिवारी गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी दार उघडताच वृद्ध दाम्पत्याचे मृतदेहच त्यांना दिसले. प्राप्त माहितीनुसार रशीद मोहंमद हे पूर्वी ट्रकचालक होते. तेच कुटुंबाचा एकमेव आधार होते. बिल्किस बानो या दोन्ही डोळ्यांनी आंधळ््या होत्या. दोन मुलांपैकी एक ट्रकचालक तर दुसरा खासगी कंपनीत नोकरी करतो. दोघेही विवाहित आहेत. लहान मुलगा आठ-दहा दिवसांतून एकदा या दाम्पत्याला केवळ पाहून जात होता. चार-पाच दिवसांपूर्वीच वृद्ध रशीद मोहंमद यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. अन्नपाणी देणाराच गेल्याने भूक आणि तहानेने व्याकूळ होऊन वृद्ध बिल्किस बानो हिचाही मृत्यू झाला असावा, असे पोलिसांचे मत आहे. शवविच्छेदनानंतरच या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा होईल.