शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तर भ्रष्टाचारी अधिकारी होणार बडतर्फ

By admin | Updated: December 16, 2015 03:02 IST

वारंवार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ केले जाऊ शकते का? यासंदर्भात कायदेशीर अभिप्राय मागविला जात आहे. सकारात्मक अभिप्राय आल्यास अशा अधिकाऱ्यांविरुद्ध

नागपूर : वारंवार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ केले जाऊ शकते का? यासंदर्भात कायदेशीर अभिप्राय मागविला जात आहे. सकारात्मक अभिप्राय आल्यास अशा अधिकाऱ्यांविरुद्ध थेट बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. विजय काळे, शरद सोनावणे यांनी पुणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव यांना पाच लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी १ आॅक्टोबर रोजी पकडल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यादव यांना २००५ मध्ये सुद्धा पुणे महानगरपालिकेतील टीडीआर घोटाळ्या प्रकरणी १ जुलै २००७ रोजी निलंबित करण्यात आले असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित करीत वारंवार भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई का केली जात नाही, असा संताप व्यक्त केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात उपरोक्त माहिती दिली. (प्रतिनिधी)हातकणंगले येथील भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील लाच घेताना पकडण्यात आलेले आरोपी उपनिबंधक (सहकारी संस्था) सुनील सिंगतकर, सहायक सहकारी वकील संजय थैल आणि सहकारी वकील अरुण कुंभार यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी केली जाईल. त्यात दोषी आढळल्यास बडतर्फ केले जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत उपस्थित प्रश्नाच्या उत्तरात दिली. डॉ. सुजित मिणचेकर यांनी हा प्रश्न विचारला होता.