शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भाताला यंदा ६० रुपये अधिक भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2016 02:39 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाताला (तांदूळ) ६० रुपये अधिक हमी भाव शासनाने दिला असून यंदा प्रति क्विंटल अ-श्रेणीतील भाताला १५१० रुपये तर सर्वसाधारण भाताला १४७० रुपये हमी भाव निश्चित करण्यात आला आहे.

जयंत धुळप, अलिबाग गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाताला (तांदूळ) ६० रुपये अधिक हमी भाव शासनाने दिला असून यंदा प्रति क्विंटल अ-श्रेणीतील भाताला १५१० रुपये तर सर्वसाधारण भाताला १४७० रुपये हमी भाव निश्चित करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतच जिल्ह्यात विविध ठिकाणी शासनाच्या माध्यमातून भात खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा पणन अधिकारी बी.आर.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.गतवर्षी रायगड जिल्ह्यात एकूण ५५ हजार ६१२ क्विंटल भात खरेदी झाली होती. यंदा त्यात विक्रमी वाढ होणार असून यंदा सुमारे ४ लाख क्विंटल भात खरेदी होणे अपेक्षित असून यंदा आॅनलाइन पद्धतीने भात खरेदी करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१६-१७ मध्ये मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था जिल्हा मार्केटिंग संस्था रायगड यांच्यामार्फत जिल्ह्यातील खालापूर, महाड, पनवेल, सुधागड तालुक्यातील मंजूर केंद्रावर भात खरेदी सुरु करण्यात येणार आहे. खरीप पणन हंगाम कालावधीत २४ आॅक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ तर रब्बी पणन हंगाम कालावधी १ मे ते ३० जून २०१७ असा राहाणार आहे. भात खरेदीच्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीचा ७/१२ चा उतारा आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान वा भरडधान्य खरेदी करण्यात येईल. या धानाची खरेदी ही आॅनलाइन पध्दतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.