शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

२८ तासांत साकारली २८ फुटांची गौतम बुद्धांची मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 21:24 IST

शिल्पकार संजय खंडेराव यांनी २८ तासांमध्ये तथागत गौतम बुद्धांची २८ फुटांची (निद्रा) निष्णान अवस्थेतील मूर्ती तयार केली

ऑनलाइन लोकमत/राहुल सोनोने वाडेगाव, दि. 30 - पातूर तालुक्यातील चतारी येथे शिल्पकार संजय खंडेराव यांनी २८ तासांमध्ये तथागत गौतम बुद्धांची २८ फुटांची (निद्रा) निष्णान अवस्थेतील मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती परिसरातील ग्रामस्थांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. चतारी येथील शिक्षक प्रवीण सरदार यांनी शिल्पकार खंडेराव यांच्याकडे मूर्ती तयार करण्याची संकल्पना मांडली. २८ डिसेंबर २०१६ला २८ तासांत २८ फुटांची मूर्ती खंडेराव यांनी साकारली. त्यांनी ही मूर्ती गावाला धम्मदान म्हणून दिली आहे. शिल्पकलेची आवड असलेल्या खंडेराव यांनी आपल्या शिल्पकलेला तथागतच्या मूर्तीपासून सुरुवात केली. त्यांना हा १० वर्षांपासून छंद असून ते विदेशातही मूर्ती बनविण्याचे काम करतात. दरवर्षी प्रत्येक संकल्प करून जेवढे तास मूर्ती बनविल्या जाईल तेवढी मोठी मूर्ती बनविण्याचा संकल्प ते करतात. बुद्धांचा शांतीचा संदेश व त्यांचे अनुकरण समाजात रुजतील, यासाठी कुटुंबाकडे तुळशिपत्र ठेवून ते १० वर्षांपासून बाहेर आहेत. चतारी येथे बैठक घेऊन येथील विहाराच्या आवारात मूर्ती बनवण्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्यांना येथील शिक्षक प्रवीण शामराव सदार, पोलीस पाटील विजय सदार, पंडित सदार, यशवंत सदार यांनी सहकार्य करून सिमेंटमध्ये ही मूर्ती बांधण्यात आली. ही (निद्रा) निष्णान अवस्थेतील मूर्ती परिसरातील सर्वात मोठी आहे.त्यामुळे, मूर्ती पाहण्यासाठी दर्शनासाठी ग्रामस्थांची मोर्ठी गर्दी होत आहे.