पुणो : व्यवस्थापन व विपणनमधील कौशल्याच्या जोरावर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविलेल्या अर्चना व्यास आणि पेप्सिको कंपनीचे इमर्जिग मार्केट (स्नॅक्स) विभागाचे उपाध्यक्ष सत्यव्रत पेंढारकर यांना ऐकण्याची संधी लोकमत वुमेन समिटमध्ये मिळणार आहे. लोकमत माध्यम समूहाच्या वतीने मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी ही समिट हॉटेल हयात येथे आयोजित करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रतील त्यांचे अनुभव समिटमध्ये सहभागी होणा:या महिलांसाठी मार्गदर्शक ठरतील.
4अर्चना व्यास : मीडिया, कम्युनिकेशन, मार्केटिंग या क्षेत्रत अर्चना व्यास यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था, कंपन्यांमध्ये त्यांनी उच्च पदावर काम केले आहे. या क्षेत्रतील त्यांना 17 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असून, सध्या त्या ‘आयसीओ’साठी ‘कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट’च्या प्रमुख आहेत. यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणा:या रेकिट बेंकिसर या बहुराष्ट्रीय कंपनीत त्या साऊथ ईस्ट एशिया विभागाच्या कम्युनिकेशन अँड मीडिया मॅनेजर या पदावर कार्यरत होत्या. या ठिकाणी त्यांनी नऊ वर्षे कंपनीच्या 3क् पेक्षा जास्त उत्पादनांच्या मीडिया, कम्युनिकेशन आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. जनसंपर्क आणि जनसंज्ञापन विषयाची पदविका तसेच बिझनेस मॅनेजमेंट या विषयाची पदव्युत्तर पदविकाही त्यांनी मिळविली आहे.
4सत्यव्रत पेंढारकर : सत्यव्रत पेंढारकर यांनी पेप्सिको या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सलग 1क् वर्षे अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्या ते कंपनीच्या इमर्जिग मार्केट (स्नॅक्स) विभागाचे उपाध्यक्ष आहेत. पेप्सिको ही स्नॅक्स आणि शीतपेये उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनीचा भारतात व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने पेंढारकर यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी समर्थपणो पेलली आहे. या कंपनीत आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. त्यापूर्वी ते ब्रिटानिया इंडस्ट्रीज या कंपनीत चार वर्षे वरिष्ठ पदावर कार्यरत होते. ‘कोट्स’ या बहुराष्ट्रीय टेक्सटाईल कंपनीतही त्यांनी 7 वर्षे विविध पदांवर काम केले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील 21 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी व्यवस्थापन व मार्केटिंगवर प्रभुत्व मिळविले आहे. त्यांनी मार्केटिंग या विषयात एमबीएची पदवी संपादन केली आहे, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवीही त्यांनी मिळविली आहे.