शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलची रक्तपेढी ठरली आदर्श

By admin | Updated: January 7, 2015 01:00 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) दुरवस्थेबाबत नेहमीच ओरड होत असते. परंतु याच अपुऱ्या संसाधनाच्या बळावर आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) या वर्षी

सलग तिसऱ्यांदा कामगिरी : वर्षभरात संकलन केल्या ११ हजारावर रक्तपिशव्यानागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) दुरवस्थेबाबत नेहमीच ओरड होत असते. परंतु याच अपुऱ्या संसाधनाच्या बळावर आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) या वर्षी अनुदान न मिळताही मेडिकलच्या रक्तपेढीने एका वर्षात ११ हजार २३ रक्तपिशव्यांचे संकलन करून आदर्श घालून दिला आहे. खासगी रक्तपेढ्यांच्या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी ही कामिगरी मेडिकलच्या रक्तपेढीने केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अव्यवस्था व दुरवस्था याबाबत नेहमी चर्चा होत असते. परंतु डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी अधिष्ठातापदाचा भार सांभाळताच अनेक चांगली कामे पार पडत असल्याचे दिसून येत आहे. यात भर पडली ती आता आदर्श रक्तपेढीची. डॉ. निसवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानाची चळवळ जामोने राबविण्याला सुरुवात झाली. रक्तदानाची चळवळ लोकांमध्ये रु जविण्यासाठी मेडिकलच्या रक्तपेढीतील डॉक्टरसह सर्वच अधिकारी-कर्मचारी गेल्या अनेक वर्षांंपासून प्रयत्नरत आहेत. विशेष म्हणजे या वर्षी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) कडून अनुदान मिळाले नाही. परिणामी नॅकोतर्फे खास रक्तदान शिबिरांसाठी वापरण्यात येणारी मोबाईल व्हॅन बंद पडली आहे. असे असले तरी, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संघटना, कार्यालयांना रक्तदानाचे आवाहन करून त्या प्रत्येक ठिकाणी मेडिकलची चमू पोहोचून रक्तदान शिबिर घेत आहे. यामुळे रक्तदात्यांची संख्याही वाढली. त्यामुळेच मेडिकलने मागील दोन वर्षी १०-१० हजार रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत. तर या वर्षी ११ हजारावर मजल गेली आहे. या कामगिरीने इतरांसाठी आदर्श घालून दिला आहे. या कामगिरीत अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. दिनकर कुंभलकर, रक्तपेढीचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पराते, समाजसेवा अधीक्षक किशोर धर्माळ यांच्यासह रक्तपेढीतील डॉक्टर, कर्मचारी, तंत्रज्ञ आदींचा सिंहाचा वाटा आहे. मेडिकलच्यावतीने सिकलसेल, थॅलेसेमिया, बीपीएलच्या व गरजू रुग्णांना नि:शुल्क रक्ताचा पुरवठा करते. यामुळे रक्तदात्यांनी मेडिकलच्या रक्तपेढीत रक्तदान करून मदतीचा हात द्यावा, असे आवाहन डॉ. पराते यांनी केले आहे. (प्रतिनिधी)