शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चेरफलवाडी आदिवासी बांधवांचा आदर्श निर्णय

By admin | Updated: May 6, 2017 06:10 IST

सर्वसामान्यांचे व आदिवासींचे महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यात मुला-मुलीचा विवाह करणे म्हणजे खिशाला कात्री, यासाठी वडील

विनोद भोईर/ लोकमत न्यूज नेटवर्कपाली : सर्वसामान्यांचे व आदिवासींचे महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यात मुला-मुलीचा विवाह करणे म्हणजे खिशाला कात्री, यासाठी वडील कर्ज घेऊन लग्न करतात आणि आयुष्यभर या कर्जाच्या ओझ्याखाली राहतात. या सर्व गोष्टींचा विचार करून सुधागड तालुक्यातील उद्धर ग्रामपंचायत हद्दीतील चेरफलवाडीतील आदिवासी बांधवांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्न समारंभावरील वायफळ खर्च व विनाकारण सावकाराच्या कर्जात बुडण्यापेक्षा सामूहिक विवाह पद्धतीचा रामबाण उपाय शोधून काढला आहे. यावर गावपातळीवर बैठक घेऊन ते सत्यात उतरविले.२ मे रोजी चेरफलवाडी येथे १४ जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन गावपातळीवर करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यासाठी शासनाकडून एकही रुपयाची मदत किंवा कोणतेही सहकार्य न घेता या सोहळ्याचे नियोजन केले होते. विवाह सोहळ्यात चेरफलवाडी येथील १४ नवरदेव, तर ५ नवऱ्या मुली व इतर तालुक्यातील ९ मुलींनी सहभागी होऊन, या सामूहिक विवाह सोहळ्यात सप्तपदी घेतली.या सामूहिक विवाह सोहळ्याला पेण-सुधागडचे कार्यक्षम आमदार धैर्यशील पाटील, शेकापनेते अ‍ॅड. सुभाष पाटील, शशिकांत आचार्य, निवृत्त शिक्षक गणपत बांगारे, पोलीस अधिकारी गणपत पिंगाला, उद्धर ग्रा. पं. उपसरपंच वसंत बांगारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी निवृत्त शिक्षक गणपत बांगारे यांच्या मार्गदर्शनाखाली दामा निरगुडे, वसंत बांगारे, नारायण हंबीर, राजू बांगारे यांच्यासह वाडीतील ग्रामस्थ, तरु ण व महिलांनी परिश्रम घेतले. विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन शिक्षक राजू बांगारे यांनी केले.आम्ही राबविलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे सहभागी झालेल्या १४ जोडप्यांच्या वडिलांचे किमान प्रत्येकी लाख ते दीड लाख रुपयांची बचत झाली आहे.- गणपत बांगारे, निवृत्त शिक्षक आम्ही शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता गावपातळीवर बैठक घेऊन लग्नसमारंभात वायफळ होणाऱ्या खर्चावर लगाम घालण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.- वसंत बांगारे, उपसरपंच, उद्धर