शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘आदर्श अंगणवाडी योजना’

By admin | Updated: May 23, 2017 01:07 IST

८५ कोटी खर्च अपेक्षित : पाच हजार अंगणवाड्यांना आदर्श बनविण्याचे उद्दिष्ट

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने ८५ कोटी रुपये खर्चून यंदा ‘आदर्श अंगणवाडी योजना’ राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी ५ हजार अंगणवाड्या आदर्श करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ० ते ६ वयोगटांतील बालकांचा भौतिक, शारीरिक आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अंगणवाडीतून प्रयत्न केले जातात. त्याबरोबरच पोषणयुक्त आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, औपचारिक शालेय शिक्षण या सेवा अंगणवाडीमार्फत देण्यात येतात. यामधील शिक्षण आनंददायी व्हावे, तेथील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी ‘आदर्श अंगणवाडी योजना’ आखली आहे. ‘आदर्श अंगणवाडी’मध्ये सौरऊर्जा संच, ई-लर्निंग, मुलांसाठी टेबल-खुर्च्या, स्थानिक साहित्यावर आधारित शैक्षणिक साहित्य, स्वच्छ भारत कीट, वीजविरहित वॉटर प्युरिफायर, इलेक्ट्रॉनिक वजन-काटे, उंची मोजण्यासाठीच्या टेप हे साहित्य असेल तसेच इमारत शैक्षणिक मदत केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल. या सर्व सेवा पुरविण्यासाठी एका अंगणवाडीला १ लाख ६५ हजार रुपये खर्च येणार आहे. त्यानुसार ५ हजार अंगणवाड्यांसाठी ८४ कोटी ५० लाख रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी राज्यातील ६८ हजार स्वत:च्या इमारती असलेल्या अंगणवाड्यांची प्राधान्याने निवड करण्यात येणार आहे. ६ महसूल विभागांत ५ हजार अंगणवाड्या आदर्श करताना प्रत्येक महसूल विभागात ८३३ अंगणवाड्या आदर्श केल्या जातील. हीच संख्या प्रत्येक जिल्ह्यासाठी १४४ इतकी असेल. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे या योजनेचे सनियंत्रण राहणार असून मूलभूत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यातून अंगणवाड्यांची सध्याची स्थिती लक्षात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावर सनियंत्रण, मार्गदर्शनासाठी सुकाणू समिती व अंमलबजावणीसाठी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. अनेक अंगणवाड्यांकडून आधीच निकष पूर्णशासनाने आदर्श अंगणवाड्यांची ही योजना जाहीर केली असली तरी आधीच अनेक जिल्ह्यातील अंगणवाड्यांनी आयएसओ प्रमाणपत्रेही घेतली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील ४ अंगणवाड्यांनी ही प्रमाणपत्रे घेतली असून जिल्ह्यातील ३०० अंगणवाड्या आयएसओ प्रमाणपत्रासाठी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पारितोषिकेजिल्ह्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या आदर्श अंगणवाड्यांना अनुक्रमे ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये बक्षीस दिले जाईल तर राज्यातील पहिल्या तीन आदर्श अंगणवाड्यांना १ लाख, ६५ हजार व ३५ हजार याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील.