शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाच्या ‘जीआर’मध्ये बदलाचा विचार

By admin | Updated: February 19, 2016 01:50 IST

राज्य एका वर्षात टँकरमुक्त होईल; शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांचा आशावाद.

अकोला : जलयुक्त शिवार अभियानाची कामे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या जुन्या शासननिर्णयात (जीआर) बदल करुन नवीन शासन निर्णय जारी करण्याचा शासनाचा विचार आहे. गाव हे घटक धरण्याऐवजी लघू पाणलोट क्षेत्रालाच घटक धरण्यात येईल, असे केल्यास राज्य एका वर्षात टँकरमुक्त होईल आणि राज्यातील नाले, नद्या बारमाही वाहू लागतील, असा दावा खान्देशातील शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केला.एक वर्षापासून जलयुक्त शिवार अभियानात राज्यात नाल्यांचे खोलीकरण करण्यात येत असून, साखळी व सिमेंट बंधारे बांधण्यात येत आहेत; परंतु सध्याच्या शासन निर्णयानुसार गाव हा घटक धरू न नाला खोलीकरण, बंधार्‍यांची कामे केली जात आहेत. त्यामुळे माथा ते पायथा पाण्याचे संवर्धन होत नसल्याने कामात तांत्रिकदृष्ट्या बदल करावे लागणार आहेत. प्रत्येक नदीच्या पाणलोट क्षेत्रातील प्रत्येक लघू पाणलोट अंतर्गत लहान-मोठय़ा नाल्यांवर ३00 ते ५00 मीटर अंतरावर तांत्रिक अभ्यास करू न छोटे बंधारे बांधणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. लघू पाणलोटाशिवाय जलयुक्त शिवार अभियान यशस्वी होणे अशक्य आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून या विषयावर विचारमंथन केले. या संदर्भातील सर्व तांत्रिक बाजू लक्षात आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवीन शासननिर्णयाचा मसुदा तयार करू न देण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या त्यावर काम सुरू असल्याचे सुरेश खानापूरकर, जलतज्ज्ञ यांनी सांगीतले.