शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस अधिकारी मनीषा व मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:22 IST

राज्यातील ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - राज्यातील ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांच्या एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केली आहे. मन्मथ म्हैसकर असे मुलाचे नाव आहे. मलबार हिलमधील इमारतीवरुन उडी मारुन मन्मथने आत्महत्या केली. मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत तर,  मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय मन्मथ म्हैसकर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्राला भेटायचं असल्याचं सांगून घराबाहेर पडला होता. साडे सात वाजण्याच्या सुमारास मन्मथने मलबार हिलमधील दरिया महल इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मात्र मन्मथचा जागीच मृत्यू झाला होता. मलबार हिल पोलिसांनी पोस्टमॉर्टमकरिता मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मलबार हिल पोलिसांनी चौकशीसाठी दोन मित्रांना ताब्यात घेतलं आहे. 
 
हत्या, आत्महत्या की अपघात ?
मन्मथ म्हैसकर आपला मित्र अग्रवाल याच्या घरी जातोय असं सांगून सकाळी सात वाजता घराबाहेर पडला होता. मात्र साडे सात वाजण्याच्या सुमारास त्याने उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. पण पोलिसांनी त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतलं असल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. आता ही नेमकी आत्महत्या होती, हत्या की अपघात यादृष्टीने तपास सुरु आहे.