शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस अधिकारी दाम्पत्य मिलिंद व मनीषा म्हैसकर यांच्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 04:29 IST

ज्येष्ठ आयएएस अधिकारी दाम्पत्य मिलिंद व मनीषा म्हैसकर यांचा एकुलता एक मुलगा मन्मथ (१८) याने मंगळवारी सकाळी २० मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्येष्ठ आयएएस अधिकारी दाम्पत्य मिलिंद व मनीषा म्हैसकर यांचा एकुलता एक मुलगा मन्मथ (१८) याने मंगळवारी सकाळी २० मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले असून, मन्मथचा मोबाइल सापडलेला नाही, असे मलबार हिल पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर दुपारी मन्मथचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला. चंदनवाडी स्मशानभूमीत दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक अधिकारी त्या वेळी उपस्थित होते.मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत, तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत. मरिन ड्राइव्ह परिसरात म्हैसकर दाम्पत्य राहते. पुण्यात शिकणारा मन्मथ दोन दिवसांपूर्वीच घरी आला होता. मंगळवारी सकाळी तो दरिया महलमध्ये राहत असलेला मित्र वशिष्ट अग्रवाल याच्या घरी जातो, असे सांगून निघाला. त्यानंतर सहा वाजून ५० मिनिटांनी त्याने दरिया महल या इमारतीत प्रवेश केला. सव्वासातच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसले आहे. सुरक्षारक्षकाने माहिती दिल्यानंतर पोलीस दाखल झाले. वशिष्टने मन्मथला ओळखले. त्याला जे. जे. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. टोकाचे पाऊल का उचलले?मन्मथने सेंट झेवियर्समध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. सध्या तो पुण्याच्या सिम्बॉयसिस महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत होता. तो तेथे वसतिगृहात राहत होता. पुण्याला पाठविल्यामुळे तो अस्वस्थ होता. त्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासह अनेकांनी म्हैसकर दाम्पत्याचे सांत्वन केले. मन्मथचे आजोबा अरुण पाटणकर यांना शोक आवरणे कठीण झाले होते.