शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘आई’ महोत्सवातून होणार विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 01:54 IST

‘आई’ हा शब्द उच्चारताच प्रेमळ आणि मायेची सावली देणारी प्रतिमा क्षणार्धात उभी राहते.

मुंबई : ‘आई’ हा शब्द उच्चारताच प्रेमळ आणि मायेची सावली देणारी प्रतिमा क्षणार्धात उभी राहते. आईविषयीचे ऋण फेडणाऱ्या ‘आई’ महोत्सवाचे आयोजन चांदिवलीत करण्यात आले आहे. ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी ७ वाजता चांदिवली म्हाडा कॉलनीतील गणेश मैदान येथे हा महोत्सव रंगणार आहे. चांदिवली म्हाडा विकास समिती आणि नारीशक्ती तर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आई’वर आधारित व्याख्यानांची पुष्पे अनेक मान्यवर गुंफणार आहेत. ३ नोव्हेंबर रोजी जे. जे. रुग्णालय मुख्य अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने ‘मी व माझी आई’ या विषयावर बोलतील. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. तर ४ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर ‘आई’ या विषयावर कीर्तनरुपी व्याख्यान देतील. वीरमाता अनुराधा गोरे यांची या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी ‘आईच्या काळजातून..एक आत्मकथन! ’ याविषयावर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ विचार मांडतील. ठाण्यातील डीसीपी रश्मी करंदीकर यांची या दिवशी खास उपस्थिती असेल. तर शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील ‘जिजाऊच्या संस्कारातून साकारलेले स्वराज्य... अर्थात छत्रपती शिवाजी महाराज ’ या विषयावर रविवारी, ६ नोव्हेंबर रोजी प्रकाशझोत टाकणार आहेत. यावेळी कवी अरुण म्हात्रे यांच्या काव्यमैफिलाचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे. (प्रतिनिधी)