शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मराठीचा विकास करायला हवा

By admin | Updated: February 28, 2017 02:48 IST

मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनाची जबाबदारी मराठी भाषिकांनी पार पाडायला हवी

म्हसळा : मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनाची जबाबदारी मराठी भाषिकांनी पार पाडायला हवी, तरच मराठी भाषेचा पूर्णपणे उदय होऊ शकतो. जाणीवपूर्वक व जबाबदारीने मराठी भाषेचा विकास हा करायला हवा. मला आज मराठी भाषेचा अभिमान वाटत आहे व मी मराठी भाषेचा प्राध्यापक असल्याचा मला गर्व आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा आणि साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा.दिगंबर टेकळे यांनी के ले.येथील कोकण उन्नती मित्र मंडळ, मुंबईच्या वसंतराव नाईक कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आणि मराठी भाषा व साहित्य मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी टेकळे बोलत होते. कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फवि.वा. शिरवाडकर यांचा जन्म दिन हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी महाराष्ट्र शासनाने संगणक व महाजालावरील मराठी तसेच युनिकोड आणि विकिपीडियावर लेखनासाठी आवाहन केले होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या स्वलिखित स्वरूपात कवितांचे वाचन करण्याचे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्र माची सुरवात सायली चव्हाण, वेदिका कोबनाक आदींसह विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने करण्यात आली. अजित जंगम, मोहन जाधव, नीलम वारळकर आणि इतर विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी करडे, साळवे यांनी काव्यवाचनात भाग घेतला.प्रा.समेळ यांनी विकिपीडियावर लिखाण करण्याचे आवाहन केले. सायली चव्हाण, नीलम वारळकर, वेदिका कोबनाक व इतर विद्यार्थिनींनी गायलेल्या पसायदान या गीताने कार्यक्र माची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)>प्रवाशांना मराठी पुस्तकांची भेटश्रीवर्धन : रा. प. मंडळाच्या श्रीवर्धन आगारात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा उगम, भाषेतील लिखित साहित्य व मराठी अस्मिता या विविध विषयांवर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. नगर पालिका विरोधी पक्षनेते प्रीतम श्रीवर्धनकर यांनी मातृभाषेतून दिलेल्या शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होवू शकतो असे सांगितले.वाचनालयाचे राज्य कार्याध्यक्ष मनोज गोगटे यांनी जीवनातील वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी दिवशी रा. प. महामंडळाच्या वतीने स्थानकातील उपस्थित प्रवासी वर्गास मराठी भाषेतील पुस्तके भेट देण्यात आली. आगार प्रमुख चेतन देवधर यांनी सर्व प्रवाशांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आगार लेखाकार हरिश्चंद्र पवार आदींसह कर्मचारी उपस्थित होते.