आॅनलाइन लोकमत सोलापूरलऊळ दि ९ : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास तीन वर्षे उलटून गेली तरीही मारेक-याचा अद्यापही शोध लागत नाही. हे सीबीआय तपास यंत्रणेचे अपयश आहे. त्यामुळे माझा आता सीबीआयच्या तपास यंत्रणेवरचा संशय बळावला असून जोपर्यत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत डॉ.नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली वाहण्यात काही अर्थ नाही, असे परखड मत मुक्ता दाभोलकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले़माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील कर्मयोगी व्याख्यानमालेसाठी त्या आल्या होत्या़ त्यावेळी परतीच्या प्रवासात माढा तालुक्यातील अंनिसच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्यासाठी त्या कुर्डूवाडी परिसरातील एका खाजगी हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या. यावेळी डॉ.रवींद्र बोबडे, अरुण कोरे, प्रा.संजय साठे, अॅड. हरिशचंद्र कांबळे,रोटरीचे अध्यक्ष ज्योतीराम गोरे, संजय अस्वरे, आदिनाथ बोबडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे कार्य उल्लेखनीय आहे. व्यक्ती मारून कोणतेही विचार मारता येत नाहीत. अंनिसचे कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकरांचे विचार व कार्य पुढे नेत आहेत असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. सध्या मी महाराष्ट्रभर फिरत असताना अंनिसच्या माध्यमातून दाभोळकरांच्या कार्यकर्त्याची व नव्याने दाखल होणा-या कार्यकर्त्याचे संगठन मजबूत करत असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे़ नव्या शाखांची उभारणी होत आहे. हे पाहुन मला आनंद होत आहे. आयुष्यभर मिही डॉ दाभोलकरांचा विचार पुढे नेहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येबाबत माझा सीबीआय तपास यंत्रणेवर संशय : मुक्ता दाभोलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 18:31 IST
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास तीन वर्षे उलटून गेली तरीही मारेकºयाचा अद्यापही शोध लागत नाही. हे सीबीआय तपास यंत्रणेचे अपयश आहे.
नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येबाबत माझा सीबीआय तपास यंत्रणेवर संशय : मुक्ता दाभोलकर
ठळक मुद्देजोपर्यत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत डॉ.नरेंद्र दाभोळकरांना श्रद्धांजली वाहण्यात काही अर्थ नाहीहत्येला जवळपास तीन वर्षे उलटून गेली