शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आईबाप गेले... मायबाप लक्ष देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:30 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावर एका १० वर्षांच्या चिमुरडीने केलेल्या भाषणाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. तिचीच १४ वर्षांची बहीण राणीबागेपासून आझाद मैदानापर्यंतच्या पायी मोर्चात सहभागी झाली होती.

चेतन ननावरे मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावर एका १० वर्षांच्या चिमुरडीने केलेल्या भाषणाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. तिचीच १४ वर्षांची बहीण राणीबागेपासून आझाद मैदानापर्यंतच्या पायी मोर्चात सहभागी झाली होती. ‘आई आणि बाप दोघांनीही आत्महत्या केली असून, मायबाप सरकारही लक्ष देत नसल्याने मोर्चात सामील होण्याची वेळ आली,’ असे ती चिमुरडी सांगत होती.आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुला-मुलींचे संगोपन करणाºया आधारतीर्थ आश्रमात सध्या या दोघी राहतात. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे १४ वर्षीय श्रद्धाचे कुटुंबीय आधीच त्रस्त होेते. त्यातच व्याजाने पैसे दिलेल्या सावकाराने त्यांची जमीनही बळकावली. परिणामी, श्रद्धाच्या नैराश्यग्रस्त आई-वडिलांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. श्रद्धा सांगत होती की, गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस त्यांच्यासोबत आम्ही साजरा केला. आम्हाला कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र वर्ष उलटत आले, तरीही आश्रमाला कोणतीही मदत मिळालेली नाही. केवळ मराठा विद्यार्थिनी असल्याने अनुदान मिळत नसल्याचा आरोप नाशिकच्या आधारतीर्थ आश्रमाचे सल्लागार दीपक भदाने यांनी केला. ते म्हणाले की, आश्रमातील ९० टक्के मुले ही मराठा समाजातील आहेत. सध्या १८२ मुली व १६८ मुले अशी ३५० मुले आश्रमात आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आश्रमातील ८ शेतकºयांच्या विधवा आणि आश्रम पदाधिकारी शिधा गोळा करण्याचे काम करत असल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. म्हणूनच मोर्चात २५ विद्यार्थी आणि २५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवल्याचेही त्यांनी सांगितले.डोळ्यांत पाणी आणि मनात चीडमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील काटोल तालुक्यातील अवघ्या चार वर्षांचा आयुष पाटील हाही या मोर्चात सामील झाला होता. पांढºया रंगाचे कपडे परिधान केलेल्या या छोट्या आंदोलकांची व्यथा ऐकून सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आणि मनात चीड निर्माण होत होती. ‘शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या’ आणि ‘शेतकरी राजा आत्महत्या करू नकोस’, या दोन प्रमुख मागण्या असलेले फलक या चिमुरड्या आंदोलकांच्या हाती होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा