शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मी ट्रेलर नाही, तर पिक्चर दाखवतो- राज ठाकरे

By admin | Updated: January 11, 2017 13:26 IST

शिवसेना, भाजपाकडे पैसे आहेत माझ्याकडे नाहीत. दुस-या पक्षातील लोकं पैशांवर विकत घेत आहेत, असा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 - मी ट्रेलर नव्हे, तर पिक्चर दाखवतो. शिवसेना, भाजपाकडे पैसे आहेत माझ्याकडे नाहीत. दुसरे पक्ष पैशांच्या जोरावर लोक विकत घेत आहेत, असा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर केला आहे. मुंबई मनपा निवडणुकीत स्वबळावर लढणार असून, सर्व जागा लढवणार असल्याचंही राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. मनसेच्या अधिकृत फेसबूक पेजवरून ते लाईव्ह चॅट करत होते.  दरम्यान, नाशिक महापालिकेचं कर्ज फेडून मी कामे करून दाखवली आहेत. नाशिकमध्ये केलेले काम इतर शहरात दाखवा. अजूनही बरीच माणसे माझ्यासोबत विश्वासाने आहेत. मी परत 60 नगरसेवक निवडून आणेन, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी वर्तमानपत्रांवरही टीका केली.

(राज ठाकरेंनी केले लोकमतचे कौतुक)

सेना आणि भाजपाने 30 वर्षं मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगली आहे. मनसेच्या चांगल्या कामावर कोणीच बोलत नाही. काही न करणा-या लोकांच्या हातात तुम्ही राज्य देऊ शकता, तेच राज्य माझ्या हातात द्या, मी विकास करून दाखवतो, असं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केलं आहे. सर्व टोलनाके माझ्यामुळेच बंद झाले, मात्र तरीही मनसेला कोणी शबासकीची थाप देत नाही, अशी खंत त्यांनी फक्त केली.  नोटाबंदीमुळे सर्वजण त्रासलेले असताना भाजपाला मात्र त्याचा फटका कसा बसत नाही? असा खडा सवाल त्यांनी विचारला. तसेच परप्रांतीयांचा मुद्दा मी सोडलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्ता एकत्र उपभोगत असताना सेनेच्या भ्रष्टाचारात भाजपा कशी सहभागी नाही, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. समुद्रात शिवस्मारकाचा पुतळा कसा उभारणार, तुमच्याकडे तेवढा पैसा आहे का ?, माणसे जिवंत राहण्यासाठी पैसे खर्च करत नाही, मात्र नको त्या गोष्टींवर सरकार पैसे खर्च करत आहे. निवडणुकीच्या तोंडावरच शिवस्मारकाचा घाट घातला जातोय, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. शिवस्मारकापेक्षा गडकिल्ल्यांची डागडुजी करा, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला आहे.