शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

देशात मला व्यक्ती स्वातंत्र्य नाही का ?, मधुर भांडारकर यांचा काँग्रेसला सवाल

By admin | Updated: July 16, 2017 12:28 IST

मधुर भांडारकर दिग्दर्शित "इंदू सरकार" चित्रपटाला काँग्रेसनं तीव्र विरोध सुरूच ठेवला आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 16 - मधुर भांडारकर दिग्दर्शित "इंदू सरकार" चित्रपटाला काँग्रेसनं तीव्र विरोध सुरूच ठेवला आहे. पुण्यापाठोपाठ आता नागपुरातही मधुर भांडारकर विरोधात काँग्रेसनं निदर्शनं केली आहेत. नागपुरात मधुर भांडारकर हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये थांबले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना हे समजताच कार्यकर्ते हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये धडकले. त्याच वेळी मधुर भांडारकर पोलीस सुरक्षा व्यवस्थेत विमानतळावर रवाना झाले. भांडारकरच्या मागोमाग काँग्रेस कार्यकर्तेही विमानतळाकडे रवाना झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांचा मधुर भांडारकर यांच्या अंगावर शाही फेकण्याचा इरादा असल्याचंही समोर आलं आहे. पुण्यात एका हॉटेलमध्ये चित्रपटाची पत्रकार परिषद सुरु असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. आता नागपुरातही भांडारकरची पत्रकार परिषद काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळून लावली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसून आंदोलन केलं. गोंधळामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागली असल्याची माहिती मधूर भांडारकर यांनी दिली आहे. भांडारकर यांनी या प्रकाराचा राहुल गांधींना टॅग करत ट्विटरच्या माध्यमातून निषेध नोंदवला आहे. देशात मला व्यक्ती स्वातंत्र्य नाही का ?, काँग्रेसचं गुंडगिरीला समर्थन आहे का ?, असा सवाल मधुर भांडारकर यांनी राहुल गांधींना विचारला आहे. मधुर भंडारकर यांनी "इंदू सरकार" या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात पत्रकार परिषदेच आयोजन केलं होतं. पत्रकार परिषदे एनआयबीएम रस्त्यावरील बीटोज बार एंड किचन या हॉटेलमधे ठरली होती. मात्र काँग्रेस कार्यकर्ते तिथे विरोध करु शकतात हे लक्षात आल्यानंतर ती पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. त्यानंतर मधूर भांडारकर बावधनमधील सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटमधील पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र त्या ठिकाणीही काँग्रेस कार्यकर्ते विरोध करण्यासाठी तयार असल्याने मधूर भांडारकर यांनी तोही कार्यक्रम रद्द केला आणि ते पुणे स्टेशनजवळील क्राऊन प्लाझा या ठिकाणी पोहोचले. या हॉटेलमधे पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली.
आणखी वाचा
या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.  28 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होईल