शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"मी अॅट्रॉसिटीबाबत तसं काही बोललो नव्हतो", शरद पवारांचा यू-टर्न

By admin | Updated: August 30, 2016 19:52 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत फेरविचार करून हा कायदा रद्द करावा, असे केलेल्या वक्तव्यावरून काही तासांमध्येच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घूमजाव केला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 - कोपर्डी बलात्कारप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत फेरविचार करून हा कायदा रद्द करावा, असे केलेल्या वक्तव्यावरून काही तासांमध्येच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घूमजाव केला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, असे कधीही बोललो नसल्याचे पवारांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

हा कायदा रद्द करू नका, पण कोणत्याही कायद्याचा गैरवापरही होता कामा नये, असे मत पवारांनी मांडलं आहे. दलितांनी कधीही अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर केला नाही. उलट दोन सवर्णांच्या भांडणात दलित तरुणांचा वापर करून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. हा गैरवापर होऊ नये एवढेच आपल्याला म्हणायचे होते. हा कायदा रद्द करावा, असे कधीही बोललो नसल्याचे यावेळी शरद पवारांनी अधोरेखित केले. आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला गेला, असे सांगत पवार यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी समाजाचे मोठे मोर्चे निघत आहेत.

त्यात मराठा समाजाला आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी याबाबतच्या मागण्या केल्या जात आहेत. जेव्हा एखादा वर्ग ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतो, तेव्हा त्या मागचे सत्य सरकारने जाणून घेतले पाहिजे. दलित, उपेक्षित आणि अन्य समाजात कधीही अंतर वाढता कामा नये, ही माझी भूमिका आहे. उस्मानाबाद आणि कोपर्डीला ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी होत्या. त्यामुळे गुन्हेगाराला जात धर्म नसतो. अशा वेळी एका विशिष्ट समाजाला दोषी धरणे चुकीचे आहे, असे पवारांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान मराठवाड्यात मुस्लीम तरुणांवर एटीएसकडून सरसकट सुरू असलेली कारवाई चुकीची असल्याचे पवार म्हणाले आहेत. इसिसच्या कारवायांचा निषेध मुस्लिम संघटनांनीही केल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात तरुणांना अटक केल्यानंतर नियमानुसार २४ तासांत स्थायिक न्यायालयात हजर करण्याचे कायदे आहे. मात्र, अटकेनंतर ३६ तसेच ७२ तास झाल्यानंतर अटक केलेल्या तरुणांना न्यायालयात हजार केले जात नाही. हे चुकीचे असल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले. अंतर्गत सुरक्षा कायद्याच्या नावाखाली राज्य सरकार नव्याने आणीबाणी आणू पहात आहे की काय असा प्रश्न पडला असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.