शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मी तर छत्रपतींचा सेवक - मुख्यमंत्री

By admin | Updated: June 27, 2016 05:19 IST

मुख्यमंत्री झाल्यावर मी छत्रपती शिवरायांच्या विचारानेच काम करण्याचा संकल्प केला आहे. मी त्यांचा सेवक आहे.

कोल्हापूर : मुख्यमंत्री झाल्यावर मी छत्रपती शिवरायांच्या विचारानेच काम करण्याचा संकल्प केला आहे. मी त्यांचा सेवक आहे. संभाजीराजे यांची खासदारपदी निवड व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी त्याच भूमिकेतून केवळ लखोटा घेऊन जाण्याचे काम केले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांना लगावला.कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी शनिवारी ‘न्यू पॅलेस’ या राजवाड्यावर जाऊन छत्रपतीचे वारस असलेल्या परिवारासोबत स्रेहभोजन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर अत्यंत खोचक प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, ‘इतिहास पाहिला तर असे दिसते की पूर्वी छत्रपती हे पेशव्यांची नियुक्ती करायचे. हे पेशवे फडणवीस नेमत असत, परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणात उलटे झाले आहे. इथे तर फडणवींसांनीच छत्रपतींची नियुक्ती केली आहे!’ पवार यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियात बरीच उलट-सुलट प्रतिक्रिया उमटली. काहींना पवारांचे हे विधान जातीयवादी वाटले, तर काहींनी त्यांच्या समयसूचकतेला दाद दिली. मात्र, पवार यांच्या वक्तव्यातील खरी खोच लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना कागल येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी शाहूंच्या विचारांचा सन्मान म्हणून संभाजीराजेंची नियुक्ती केली आहे. त्यात माझी भूमिका केवळ लखोटा घेऊन जाण्यापुरतीच होती. ‘जाणता राजा’ कसं म्हणायचं?-तावडेशाहूंच्या विचारांचे कार्य आणि वारसा लक्षात घेऊन पंतप्रधानांच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी संभाजीराजेंना खासदार म्हणून नियुक्त केले, असा कृतज्ञापूर्वक उल्लेख शाहू महाराजांनी येथे रविवारी एका कार्यक्रमात केला. तोच संदर्भ देत शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, हाच मुद्दा काल (शनिवारी) दुपारी तुमच्या वाड्यावर जेवायला आलेल्या पाहुण्यांना (शरद पवार) सांगितला असता, तर संध्याकाळी त्यांच्याकडून नको ती टीका झाली नसती. पूर्वी छत्रपतींच्या काळात जावळीच्या मोऱ्यांना, डफळ्यांना आणि सुप्याच्या मोहित्यांना छत्रपतींचं कधी चांगलं दिसलंच नाही. त्याचीच पुनरावृत्ती काल येथे झाली. मोदी सरकारनं दिल्लीच्या तख्तावर सन्मानानं संभाजीराजेंची राष्ट्रपतींकडून नियुक्ती केली. या गोष्टीकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला पाहिजे होते. परंतु त्यांना चांगलं काही दिसलंच नसल्याची टीका केली. मग यांना जाणता राजा कसं म्हणायचं, असा सवाल केला. (प्रतिनिधी)>कार्यकर्त्यांना अटकमराठा आरक्षणासाठी फडणवीस यांच्यासमोर निदर्शने करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या स्वाभिमान संघटनेच्या २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फडणवीस रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांचा ताफा अडवून आरक्षणासाठी निदर्शने करण्यासाठी स्वाभिमान संघटनेचे २५पेक्षा जास्त कार्यकर्ते सावित्रीबाई फुले रुग्णालयासमोर जमले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने त्यांचे आंदोलन बारगळले.