शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मी नवीन नवरी, नवरा माझा जुना गं!

By admin | Updated: January 18, 2016 00:48 IST

देवादारी झाला काय गुन्हा गं मी नवीन नवरी, नवरा माझा जुना गं।

मंगेश पांडे, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) : देवादारी झाला काय गुन्हा गंमी नवीन नवरी, नवरा माझा जुना गं। तरुणपणाच्या याला नाहीत खुणा गंमी नवीन नवरी, नवरा माझा जुना गं।।या कवितेला रसिकांनी शिट्या अन् ‘वन्स मोअर’ने भरभरून दाद दिली. महिला आणि शेतकऱ्यांवर आधारित कवितांनाही रसिकांनी टाळ्या वाजवीत दाद दिली. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी रात्री निमंत्रितांचे कविसंमेलन झाले. यामध्ये राज्याच्या विविध भागांतील ३२ कवींनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी प्रफुल्ल शिलेदार होते. उस्मानाबाद येथील उत्तम लोकरे या आजोबांनी सादर केलेल्या ‘साठ वर्षांचा नवरा, वीस वर्षांची नवरी’ या कवितेने संपूर्ण सभागृह खदखदले. शिट्या आणि टाळ्यांची बरसात झाली. त्यांची कविता संपल्यानंतर दुसरे कवी पोडिअमवर आले. मात्र, रसिकांचा ‘वन्स मोअर’चा गलका थांबत नव्हता. अखेर लोकरे यांना ‘वन्स मोअर’ द्यावाच लागला. गुलबर्गा, कर्नाटकातील बी. ए. कांबळे यांनी ‘साल जाईल’ ही कृषी जीवनावर आधारित कविता सादर केली, तर ‘गांधींनी जगाला दिला अहिंसेचा मंत्र, आज का कोणालाच कळत नाही त्याचे सूत्र’ ही चारोळी बडोद्यातील मालिनी सराफ यांनी सादर केली. यासह नागपूरच्या दीपक रंगारी यांनी ‘त्याचं सरण कोणी पेटवून दिलं आणि नाही म्हणता म्हणता, आभाळ पेटल्याची गावभर बोंब झाली’ ही कविता सादर केली.‘पंख पसरू झेप घेऊ, पंथ सांगू नेमका, माणसांना जोडणारा पूल बांधू नेमका’ अशाप्रकारे सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून मार्गक्रमण करणारी ‘पंख पसरू’ ही कविता नागपूर येथील ज्ञानेश्वर वांढरे यांनी सादर केली. नाशिकचे तुकाराम धोंडे, चंद्रपूरच्या माधवी भट, सोलापूरचे सुरेश लोंढे, चंद्रपूरचे पद्मरेखा धनकर आणि पिंपरी-चिंचवडजवळील चिखलीगावातील कवी प्रशांत चव्हाण यांनी विविध कविता सादर केल्या.