शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

खाडीजवळच्या झोपड्या पावसानंतर तुटणार

By admin | Updated: June 10, 2016 03:14 IST

शास्त्रीनगर, जानकीनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर आदी परिसरांची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तब्बल तीन तास पाहणी केली.

ठाणे : खाडीकिनारी असलेल्या शास्त्रीनगर, जानकीनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर आदी परिसरांची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तब्बल तीन तास पाहणी केली. अनधिकृतपणे खारफुटीची तोड करून बांधण्यात आलेल्या बांधकामांवर पावसाळ्यानंतर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजता कळवा चौक येथून शास्त्रीनगर, जानकीनगर, भीमनगर, महात्मा फुलेनगर, अण्णा भाऊ साठेनगर आदी परिसरांची त्यांनी फिरून पाहणी केली. या पाहणीच्या वेळी त्यांनी खाडीकिनारी खारफुटीची तोड करून बांधण्यात आलेल्या झोपडपट्ट्या पावसाळ्यानंतर तोडण्याचे आदेश दिले. या भेटीदरम्यान त्यांनी कळवा चौक, कळवा स्टेशन रोड आणि बुधाजीनगर येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. बुधाजीनगर येथील रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले. या वेळी आयुक्तांनी भीमनगरपासून साकेतपर्यंत अक्षरश: पाइपलाइनवरून चालतचालत या परिसराची पाहणी केली. पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत परिमंडळ-१ चे उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल, शहर व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, कार्यकारी अभियंता अरविंद इताडकर, कार्यकारी अभियंता मनोज तायडे, सहायक आयुक्त सागर घोलप आदी उपस्थित होते.दरम्यान, सकाळी आयुक्तांनी तीनहातनाका येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी करून गटार आणि रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, सायंकाळी कावेसर येथील तलावाच्या कामाची पाहणी केली. तलावातील काढलेला गाळ त्वरित उचलणे, आतमध्ये ग्रॅब्रियन भिंत बांधणे, संरक्षक भिंत बांधणे आणि वृक्षारोपण करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे बाळकुम येथील प्रस्तावित सेंट्रल पार्कच्या जागेची, नकाशासह संकल्पचित्राची पाहणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)