शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून पत्नीने केला पतीचा खून

By admin | Updated: June 18, 2016 18:30 IST

अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 18 : वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात झालेल्या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
 
बजरंग सीताराम कदम (वय 38, रा. अक्षय व्हिला, शिवणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी आशिष रोहिदास नलावडे (वय 28, रा. शिवणे), बाळू किसन पाकिरे (वय 34, रा. धायरी), नितीन किसन येडे (वय 24, रा. मोरेवस्ती, पद्मावती) यांच्यासह बजरंगची पत्नी सुवर्णा आणि तिची मैत्रीण सविता दत्तात्रय काळे (वय 32) यांनाही अटक केली आहे. 
 
सुवर्णाचे आणि आशिष यांचे अनैतिक संबंध आहेत. याबाबत बजरंगला संशय आला होता. त्यामुळे तो नेहमी तिला शिविगाळ करायचा. त्याला कंटाळलेल्या सुवर्णाने आशिषला त्याचा काटा काढायला सांगितले. त्याने बाळू आणि नितीनच्या मदतीने बजरंगचा 11 जून रोजी रात्री बाराच्या सुमारास खून केला होता. 
 
बजरंग रिक्षा चालक होता. तसेच तो भिशीचे पैसेही गोळा करायचा. घटनेच्या दिवशी त्याच्यासोबत अडीच लाखांची रोकड होती.मात्र त्याला हल्लेखोरांनी हात लावला नव्हता. तसेच त्याच्या अंगावरील सोनसाखळीही तशीच होती. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा खून झाला नसल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे चौकशी केली. त्याच्या अंत्यविधीच्या वेळी साध्य वेशातील महिला आणि पुरुष पोलीस सहभागी झाले. त्याच्या पत्नीवर संशय बळावल्यावर तिच्यासह मुलीवर लक्ष ठेवण्यात आले. सुवर्णाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तिने खुनाची कबुली दिली. 
 
बजरंग हा पुण्यातील सराईत गुन्हेगार बाबूलाल मोहोळचा मेव्हणा होता. त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसून तो सरळमार्गी होता असे पोलिसांनी सांगितले.