शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पतीदेखत पत्नीवर दरोडेखोरांचा सामूहिक अत्याचार !

By admin | Updated: September 12, 2015 02:02 IST

बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या दाम्पत्याच्या झोपडीवर

सातारा : बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या दाम्पत्याच्या झोपडीवर १० ते १२ जणांनी शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकला. घरात लुटालूट केल्यानंतर जाताना तीन दरोडेखोरांनी पतीला जिवे मारण्याची धमकी देत पत्नीवर सामूहिक अत्याचार केला. दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.सातारा-कोरेगाव रस्त्यावर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामावर सुरक्षारक्षक म्हणून एक दाम्पत्य नेमले आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास कोणीतरी दरवाजा ठोठावला. त्यामुळे पतीने खिडकीतून बाहेर पाहिले असता सात ते आठ लोक होते. त्यांच्या हातात काठ्या, चाकू, गज होते. ‘दरवाजा उघडा. घरात काय असेल ते द्या; अन्यथा तुम्हाला सोडणार नाही,’ असे म्हणून काही दरोडेखोरांनी खिडकीच्या काचा फोडल्या. त्यानंतर खिडकीतून आत हात घालून त्यांनी कडी काढली आणि घरात शिरून पतीला चाकूचा धाक दाखवून एका जागेवर बसविले. त्यानंतर पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र, तसेच त्याच्या पँटच्या खिशातील दीड हजारांची रोकड त्यांनी काढून घेतली. त्यानंतर पतीच्या गळ््यावर चाकू ठेवून तिघांनी पत्नीवर सामूहिक अत्याचार केला. पीडित दाम्पत्याने संबंधित घरमालकाला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू झाली. पोलिसांनी नाकाबंदी करून दरोडेखोरांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. (प्रतिनिधी)हॉटेलमध्येही चोरीदरोडेखोरांनी तेथून जवळच असलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलमध्ये असलेल्या कोल्ड्रिंक्सच्या सर्व बाटल्या रिकाम्या केल्या. तसेच जाताना त्यांनी हॉटेलमधील सिलिंडर, शेगडी, टिकाव, खोरे असे साहित्य चोरून नेले. दरोडेखोर बोलत होते तीन भाषासर्व दरोडेखोर २० ते २५ वयोगटांतील होते. आपापसांत ते हिंदी, मराठी आणि कन्नड भाषा बोलत होते. त्यांनी तोंडाला काळे रुमाल बांधले होते. पीडित महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून दरोडेखोरांचे स्केच बनविण्यात येणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.