शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या माजी प्रियकरावर पतीचा अनैसर्गिक अत्याचार

By admin | Updated: November 19, 2016 02:42 IST

लग्नानंतरही पत्नीचा एक्स बॉयफ्रेण्ड तिला मेसेज करतो, भेटण्यासाठी बोलावतो. म्हणून त्याला धडा शिकविण्यासाठी पतीने विकृत शक्कल लढवली.

मनीषा म्हात्रे,

मुंबई- लग्नानंतरही पत्नीचा एक्स बॉयफ्रेण्ड तिला मेसेज करतो, भेटण्यासाठी बोलावतो. म्हणून त्याला धडा शिकविण्यासाठी पतीने विकृत शक्कल लढवली. त्याने ३२ वर्षांच्या बॉयफ्रेण्डचे अपहरण करत चाकूच्या धाकात तब्बल चार तास त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची विचित्र घटना गुरुवारी एलटी मार्गमध्ये उघड झाली. सुरेश एडगे असे त्याचे नाव असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षांच्या तक्रारदार तरुणाने बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास येथील चिरा बाझार परिसरातून टॅक्सी पकडली. हा तरुण टॅक्सीमध्ये बसताच काही अंतर पुढे गेल्यानंतर टॅक्सीत आणखी काही जण बसले. चाकूच्या धाकाने धमकावत एडगेने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. अत्याचाराचा व्हीडीओसुद्धा काढून तो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तब्बल चार तास त्याने या तरुणावर अत्याचार सुरू ठेवले. गिरगाव ते वडाळा या प्रवासादरम्यान हा प्रकार सुरू होता. रात्री पावणे एकच्या सुमारास त्याला वडाळा परिसरात उतरवून त्याने पळ काढला. तरुणाने याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देत, थेट लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तेव्हा या विकृत पतीचे बिंग फुटले. मुळात एडगेच्या लग्नाला दीड वर्ष झाले. लग्नानंतरही तक्रारदार तरुणाचे पत्नीला येत असलेल्या मेसेजमुळे तो वैतागला होता. त्यात तो पत्नीचा एक्स बॉयफ्रेण्ड असल्याचे समजताच तो आणखी चिडला. तापट स्वभावाच्या असलेल्या एडगेने त्याला धडा शिकविण्यासाठी मित्रांच्या मदतीने त्याच्या अपहरणाचा डाव आखला; आणि चाकूच्या धाकात त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. घटनेची माहिती मिळताच एलटी मार्ग पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी त्यांनी विकृत पतीविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार, अपहरण, मारहाण, धमकावणे, संघटित गुन्ह्यांच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.