शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आजारपणाला कंटाळून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

By admin | Updated: April 11, 2017 17:56 IST

शहरातील साई रोड परिसरात राहणाऱ्या हरिश्चंद्र संगाप्पा अकनगिरे (७५) यांनी आजारपणाला कंटाळून आपली पत्नी कालिंदाबाई हरिश्चंद्र अकनगिरे (६०) यांचा गळा आवळून खून केला.

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 11 : शहरातील साई रोड परिसरात राहणाऱ्या हरिश्चंद्र संगाप्पा अकनगिरे (७५) यांनी आजारपणाला कंटाळून आपली पत्नी कालिंदाबाई हरिश्चंद्र अकनगिरे (६०) यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी घडली.मूळचे रेणापूरचे असलेले अकनगिरे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून आर्वी येथे वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हरिश्चंद्र आकनगिरे आणि कालिंदाबाई हे दाम्पत्य आजारी होते. या आजारपणामुळे दोघेही त्रस्त होते. पहाटेच्या वेळी मुलगा धर्मपाल हरिश्चंद्र अकनगिरे हे आपल्या पत्नी व मुला-बाळांसह हनुमान जयंतीनिमित्त नजिकच्या मंदिरात पहाटे गुलाल उधळण्याच्या कार्यक्रमाला गेले होते. दरम्यान, इकडे घरी हरिश्चंद्र आणि कालिंदाबाई हे दोघेच होते. यावेळी पत्नी कालिंदाबाई यांचा गळा आवाळून पती हरिश्चंद्र यांनी खून केला. त्यानंतर स्वत: छताच्या कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा आणि सून घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलगा धर्मपाल अकनगिरे यांनी आर्वी गावचे दहा वर्षे सरपंच म्हणून काम केले आहे. सध्या ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. या कुटुंबात कुठलाही ताण तणाव अथवा वाद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा कौटुंबिक वातावरणात हा प्रकार घडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.रात्रीच गप्पा झाल्या...सोमवारी रात्रीच्या भोजनानंतर मुलगा, सून आणि हरिश्चंद्र व कालिंदाबाई यांच्यामध्ये गप्पा झाल्या. तसा कुठलाही तणाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला नाही. घरात आनंदी वातावरण होते. अशा वातावरणात ही घटना घडल्यामुळे मुलगा धर्मपाललाही धक्का बसला आहे.आजारपणाला कंटाळून केले कृत्य?हरिश्चंद्र आणि कालिंदाबाई हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते. दरम्यान, या आजारपणाला कंटाळून हरिश्चंद्र अकनगिरे यांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला असावा, असा संशय पोलीस आणि कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.