धुळे : अहमदनगरहून मंदिरात उपचारासाठी आणलेल्या मनोरूग्ण महिलेने विळ््याने वार करून झोपेत असलेल्या पतीचा निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील धाडरी येथील विरोबा मंदिरात शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़साधू गोपाळ (३७, रा. जि. नगर) यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी त्याची मनोरूग्ण पत्नी जिजाबाईला ताब्यात घेतले आहे. गावकऱ्यांनी तिच्या हातातील विळा हिसकावून घेतला़ साधू गोपाळ यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मनोरूग्ण महिलेकडून पतीचा झोपेतच खून
By admin | Updated: March 14, 2016 02:42 IST