शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पतीची शिवीगाळ ही क्रूरता नव्हे !

By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST

पती-पत्नीचे भांडण झाले असेल आणि पतीने पत्नीला शिविगाळ केली असेल तर, अशावेळी पतीची ही कृती पत्नीसोबतची क्रूरता ठरत नाही. केवळ एवढ्या कारणावरून पतीला भांदविच्या

- राकेश घानोडे, नागपूरपती-पत्नीचे भांडण झाले असेल आणि पतीने पत्नीला शिविगाळ केली असेल तर, अशावेळी पतीची ही कृती पत्नीसोबतची क्रूरता ठरत नाही. केवळ एवढ्या कारणावरून पतीला भादंविच्या कलम ४९८-अ (विवाहितेशी क्रूरतापूर्ण वागणूक) अंतर्गत दोषी ठरविले जाऊ शकत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे.कोंढाळी, ता. काटोल येथील गणेश पांडुरंग कोचे (३७) हा टीव्ही व ५० हजार रुपयांसाठी शारीरिक व मानसिक छळ करतो अशी तक्रार त्याची पत्नी रश्मीने पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर ४ नोव्हेंबर १९९९ रोजी काटोल येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने आरोपीला भांदविच्या कलम ४९८-अ अंतर्गत तीन महिने सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध गणेश कोचे याने नागपूर सत्र न्यायालयात अपील केले होते. ७ नोव्हेंबर २००६ रोजी सत्र न्यायालयानेही हे अपील फेटाळून जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. परिणामी आरोपीने उच्च न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्वाळा देत गणेशला निर्दोष सोडण्याचे निर्देश दिले. कोचे दाम्पत्य जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून त्यांना एक मुलगा आहे.पुरावे अस्पष्टकनिष्ठ न्यायालयात आरोपीला एकट्या रश्मीच्या जबाबावरून शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाने आरोपीला निर्दोष सोडताना रश्मीच्या जबाबात एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, रश्मीच्या जबाबाचे समर्थन करणारा अन्य साक्षीदार नसल्याचे व प्रकरणातील पुरावे अस्पष्ट असल्याचे नमूद केले.कुटुंब न्यायालयाने मंजूर केला घटस्फोटसार्वजनिक ठिकाणी पत्नीशी व्यवहार करताना तिची बदनामी होईल, अशी भाषा वापरणे आणि सातत्याने तिला शिवीगाळ करणे, ही एक प्रकारची क्रूरताच आहे, असे म्हणत दोनच दिवसांपूर्वी वांद्रे कुटुंब न्यायालयाने ३० वर्षीय महिलेला तिच्या ४४ वर्षीय पतीपासून घटस्फोट दिला होता.