शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीसह चौघांना जन्मठेप

By admin | Updated: September 27, 2016 17:43 IST

मनोज भाबटसह तिचा प्रियकर प्रमोद रणनवरे व त्याचे सहकारी आशिष कथले तसेच नितीन घाडगे सर्व रा. यवतमाळ या चार जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. 27 - प्रेमसंबंधात अडसर ठरलेला पती मनोज भाबट रा. यवतमाळ याची आपल्या प्रियकराकरवी हत्या केल्याप्रकरणी पत्नी मोनिका मनोज भाबटसह तिचा प्रियकर प्रमोद रणनवरे व त्याचे सहकारी आशिष कथले तसेच नितीन घाडगे सर्व रा. यवतमाळ या चार जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल येथील न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी मंगळवारी दिला. या बाबत थोडक्यात हकीकत, आॅक्टोबर २०१३ मध्ये देवळी तालुक्यातील वाबगाव शिवारातील कुजलेला मृतदेह आढळला. या प्रकरणी देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृतदेहावर अनेक जखमा होत्या. तपासाअंती त्याची ओळखपटली असता तो यवतमाळ येथील असून त्याचे नाव मनोज भाबट असल्याचे समोर आले.शिवाय तो राज्य राखीव दलाचा कर्मचारी असल्याचेही तपासात उघड झाले. शरीरावरील जखमांवरून हत्येचा संशय आल्याने देवळीचे तत्कालीन ठाणेदार धनंजय सायरे यांनी तपासाची चक्रे फिरविली. यात मनोजच्या पत्नीनेच प्रियकराच्या सहायाने त्याची हत्या केल्याचे समोर आले.या सर्व घटनाक्रमावरून तत्कालीन ठाणेदार सायरे यांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात तपास पूर्ण करून पत्नी मोनिका भाबट, प्रमोद रणनवरे, अशिष कथले व नितीन घाडगे या चारही जणांवर भादंविच्या कलम ३०२, ३६४, २०१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. सदर प्रकरण तपासाअंती न्यायालयात हजर केले असता त्यावर मंगळवारी निकाल देण्यात आला. यात चारही आरोपींना कलम ३०२, ३६४ अन्वये जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिकत करावास तसेच कलम २०१ अन्वये ३ वर्षे कारवास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.न्यायालयात सदर प्रकरणी शासनाच्यावतीने प्रारंभी तत्कालीन सरकारी वकील श्याम दुबे यांनी प्रकरण चालविले. याच प्रकरणात तत्कालीन जिल्हा सरकारी वकील अनुराधा सबाणे यांनी युक्तीवाद केला. सदर प्रकरण निकालावर आले असतासरकारी वकील विनय घुडे यांनी प्रकरण पुढे नेत शिक्षेकरिता युक्तिवाद केला.वाहनातच केली हत्यामनोज हा राज्य राखीव दलाचा कर्मचारी होता. याच काळात त्याने यवतमाळ येथे घर घेतले. या घरी तो पत्नी मोनिकासह राहत होता. मात्र नोकरीच्या कारणाने तो घरी कमी व बाहेरच जास्त असायचा. मोनिका घरी एकटीच असल्याने तिचे परिसरातील प्रमोद रणनवरे याच्याशी प्रेम संबंध जुळले. याची माहिती मनोजला मिळताच या दोघांत वाद सुरू झाले. या वादातूनच मोनिकाने प्रियकराच्या मदतीने मनोजच्या हत्येचा कट रचला. यवतमाळ मार्गावर कळंब नजीक असलेल्या घाटात प्रमोदने आशिष कथले व नितीन घाडगे या दोघांंच्या सहकार्याने मनोजची वाहनातच हत्या केली. त्याचा पुरावा नष्ट करण्याकरिता मृतदेह देवळी तालुक्यातील वाबगाव येथे आणून टाकला.