लोकमत न्यूज नेटवर्कजामखेड (जि. अहमदनगर) : एमबीबीएसची बनावट पदवी प्रमाणपत्र तयार करून डॉक्टर असल्याचे भासविणाऱ्या व हुंड्यापोटी सोने, रोख रक्कम घेत छळ करणाऱ्या पतीचा पत्नीनेच भांडाफोड केला.रवींद्र उर्फ अशोक हंबीरराव पवळ (रा. डोणगाव ता. जामखेड) याने विवाहानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी कोमल हिस उपाशीपोटी मारहाण करीत घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद देत डॉक्टर पतीचे पितळ उघडे केले. पोलिसांनी बोगस डॉक्टरला अटक केली आहे. रवींद्र याने एमबीबीएस, डीएसएच डॉक्टर असल्याचे सांगितले होते. कोमलच्या वडिलांनी ११ तोळे सोने व साडेतीन लाख रुपये हुंड्यापोटी दिले होते. आणखी रक्कम न मिळाल्याने रवींद्रने कोमलला घरात उपाशीपोटी ठेवून मारहाण केली होती.
पती निघाला ’मुन्नाभाई एमबीबीएस’
By admin | Updated: June 5, 2017 04:47 IST