शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या विरहात पतीचा गळफास; पत्नीचा झाला होता अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 02:39 IST

सार्थक संजय बचाटे व त्याची पत्नी चंदा सार्थक बचाटे (२०) यांचा १० फेब्रुवारी रोजी गंगाखेड येथून गावी वडगाव स्टेशनकडे दुचाकीवरून जाताना अपघात झाला़

गंगाखेड (जि. परभणी) : महिनाभरापूर्वी अपघाती निधन झालेल्या पत्नीच्या विरहात सार्थक संजय बचाटे (२५) या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ९ मार्च रोजी सकाळी ९़३० वाजेच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन शिवारात घडली़ या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

सार्थक संजय बचाटे व त्याची पत्नी चंदा सार्थक बचाटे (२०) यांचा १० फेब्रुवारी रोजी गंगाखेड येथून गावी वडगाव स्टेशनकडे दुचाकीवरून जाताना अपघात झाला़ या अपघातात चंदा बचाटे यांचा मृत्यू झाला होता़ तेव्हापासून मानसिक तणावात असलेल्या सार्थक बचाटे या तरुणाने ९ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शेतात जाऊन स्वत:च्या मोबाईलवर पत्नीच्या नावे ‘चंदाराणी मी तुला भेटायला यायलो’ असे लिहित पत्नीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले़ तसेच आई, पप्पा, दाजी, ताई मला माफ करा, मी चाललो, भावांनो तुम्हाला आज सोडून चाललो, माझ्या मरणाला कोणीही जबाबदार नाही, असे स्टेटस शेअर करून वडगाव तांड्यावरील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. सार्थकने आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबियांनी शेतात धाव घेतली़ त्याला गंगाखेड येथील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले़ या घटनेबद्दल वडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ या प्रकरणी गंगाखेड ठाण्यात नोंद करण्यात आसली असून तपास सपोनि. राजेश राठोड हे करीत आहेत़अन् मित्र व नातेवाईकांची घटनास्थळाकडे धावसार्थक बचाटे यांनी मोबाईलवर ठेवलेले स्टेटस पाहून त्यांच्या संपर्कातील मित्र व नातेवाईकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली़ तेव्हा कुटुंबातील सदस्यांकडून तो प्रात:विधीसाठी शेतात गेल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी त्यांच्या शेताकडे धाव घेतली़ त्यानंतर सार्थक बचाटे याने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला असल्याचे दिसून आले़ त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली़ मित्र व नातेवाईकांच्या मदतीने सार्थकचा गळफास काढून त्यास गंगाखेड येथील रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Suicideआत्महत्या