शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पतीनं पत्नीच्या प्रियकराला पकडलं नाइटीत

By admin | Updated: January 9, 2017 14:17 IST

गेल्या अनेक दिवसांपासून पत्नीचे असलेले विवाहबाह्य प्रेमसंबंध पतीच्या सतर्कतेमुळे उघड झाले आहेत.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 9 - गेल्या अनेक दिवसांपासून पत्नीचे असलेले विवाहबाह्य प्रेमसंबंध पतीच्या सतर्कतेमुळे उघड झाले आहेत. बिबवेवाडीत हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकर पत्नीशी प्रेमसंबंध ठेवण्यासाठी चक्क नाइटी परिधान करून घरात येत असे. त्यामुळे पतीलाही सुरुवातीला त्याच्यावर संशय आला नाही. मात्र एकदा पती निद्राधीन असताना या प्रियकरानं घरात इंट्री केली आणि त्याचा पर्दाफाश झाला. विशेष म्हणजे हा प्रियकर पत्नीच्या शेजारीच राहत असल्याची माहिती मिळाली  आहे. प्रियकर छोटा व्यावसायिक आहे. त्याचे नाव राजेश मेहता असून, तो 44 वर्षांचा आहे. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पतीनं पोलिसांनी सांगितले की, मेहता माझ्या अनुपस्थितीत माझ्या घरात येत असल्याची माहिती मला वॉचमनकडून प्राप्त झाली आहे. त्यावेळीच मी माझी बायको आणि मेहताचे प्रेमसंबंध उघड करण्याचा निश्चय केला. गेल्या 7 वर्षांपासून मी शहराबाहेर असल्यानं तेव्हापासून यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत. मेहताला घरात येऊ नये म्हणून मी बजावलं होतं. मात्र तरीही तो घरात आला. मेहता दररोज गाऊन आणि दुपट्टा परिधान करून घरात प्रवेश करत असे.

दरम्यान, एकदा मी सकाळी लवकर उठून माझ्या बायकोसोबत व्यायामशाळेत गेलो होतो. व्यायामशाळेतून घरी आल्यानंतर नाश्ता करून मी थोडा आराम करण्याचा विचार केला. सकाळी 11च्या दरम्यान मी जेव्हा गार झोपेत होतो. त्यावेळी दुर्गंधीयुक्त वासानं मला जाग आली. त्यानंतर समोर असलेल्या त्या व्यक्तीला मी विचारलं तुम्ही कोण आहात, इथे कसे आलात, तुम्हाला काय पाहिजे, तर त्यानं मला मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं दुस-या बेडरुममध्ये जाऊन बेडरुम लॉक केला. मग मी माझ्या पत्नीला विचारलं तो कोण आहे, तुला माहीत असल्यास मला सांग. मात्र तिने ओळखत नसल्याचं म्हटलं. अचानक तो बाहेर आला आणि पळण्याचा प्रयत्न करू लागला. मी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यानं माझं टी-शर्ट फाडलं. जेव्हा मी त्याला निरखून पाहिलं तेव्हा तो मेहता असल्याचं समजलं. त्यानंतर मेहतानं मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

मात्र या प्रकारानंतर तक्रारदार पतीनं त्याच्या पुतण्याला बोलावलं आणि त्याला घेऊन जाण्यास सांगितलं. मात्र त्यावेळी तो ड्रग्ज घेत असून, नशेत असल्याचं आढळलं. मेहताविरोधात पोलिसांनी 425, 323, 504 कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मेहताला कोर्टात हजर केले असता 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.