शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

घाई करा ! जुन्या नोटा जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस

By admin | Updated: December 30, 2016 09:52 IST

चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 30 - चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 30 डिसेंबरनंतर जुन्या नोटा केवळ रिझर्व्ह बँकमध्ये 31 मार्चपर्यंत बदलून मिळणार आहेत. रिझर्व्ह बँकेतही जुन्या नोटा जमा करताना केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या मुदतीच्या आत तुम्ही नोटा का बदलून घेतल्या नाहीत?, शिवाय संबंधित पैशाच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे?, याचीही माहिती द्यावी लागणार आहे.  तसेच जुन्या नोटा बाळगणा-यांसमोर केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकुमानुसार अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जारी करण्यात आलेल्या वटहुकुमानुसार जर कुणाकडे 10 हजारपेक्षा अधिक 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या तर संबंधित व्यक्तीला कमीत कमी 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. 
 
दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जुन्या नोटा जमा करण्यासाठी तुम्हाला फॉर्म 5 भरावा लागेल. सोबत एक ओळखपत्र आणि दिलेल्या मुदतीत नोटा का जमा केल्या नाही, याची माहितीही द्यावी लागेल. मात्र, किती प्रमाणात नोटा बदलून दिल्या जाणार आहेत? तसेच याआधीही नोटा बदलून घेणा-या व्यक्तीला नोटा जमा करण्यासाठी किती वेळा संधी दिली जाणार आहे, याबाबतची माहिती अजूनही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही. शिवाय ग्राहकांच्या खात्यात केवायसी गरजेचे आहे. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, नरेगा कार्ड किंवा पॅन कार्ड चालणार आहे.  
(आयकर विभागाकडून आतापर्यंत 4 हजार 200 कोटींचं घबाड जप्त)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा, बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी देशवासियांनी 30 डिसेंबरपर्यंत स्वतःजवळ असलेल्या 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले होते.