शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग्जचा दंड शेतकऱ्यांसाठी

By admin | Updated: February 19, 2016 03:45 IST

आदेश दिल्यानंतरही बेकायदा होर्डिंग्ज लावून उच्च न्यायालयाचा अवमान करणारे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग अळवणी आणि मनसे कार्यकर्ते सचिन गुंजाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना दंड ठोठावत

मुंबई : आदेश दिल्यानंतरही बेकायदा होर्डिंग्ज लावून उच्च न्यायालयाचा अवमान करणारे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग अळवणी आणि मनसे कार्यकर्ते सचिन गुंजाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना दंड ठोठावत ही रक्कम शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नाम फाउंडेशनला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. स्वत:च्या स्टेट्सला शोभेल असा दंड भरावा, अशा कानपिचक्याही न्यायालयाने नेत्यांना दिल्या. बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यासंदर्भात सातारा येथील सुस्वराज्य फाउंडेशन व अन्य काही जणांनी केलेल्या याचिकांवर न्या. अभय ओक व न्या. सी.व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही गणेशोत्सव, नवरात्रौत्सवाच्या काळात बेकायदेशीर होर्डिंग मुंबईत झळकले. या प्रकाराची दखल घेत उच्च न्यायालयाने शेलार, आमदार अळवणी आणि गुंजाळ यांना अवमान नोटीस बजावली. शेलार यांनी खंडपीठाने बजावलेल्या नोटीसवर समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने उच्च न्यायालयाने या सर्वांना दंड भरण्याची शिक्षा सुनावली. २५ हजार रुपये महापालिकेला द्याआशिष शेलार, पराग अळवणी आणि मनसेचे सचिन गुंजाळ यांना प्रत्येकी २५ हजार रुपये महापालिकेला होर्डिंग काढण्यासाठी आलेला खर्च म्हणून देण्याचा आदेश दिला. मात्र दंडाची रक्कम निश्चित केली नाही. ‘तुम्ही तुमच्या स्टेट्सप्रमाणे दंडाची रक्कम द्या. पक्षाचे नेते आहात. साधा पक्षकार्यकर्ता २० हजार रुपये भरेल. तुम्ही किती दंड भरणार ते सांगा? प्रत्येकाने त्या रकमेतील २५ हजार रुपये महापालिकेला द्यायचे; तर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या संस्थेला (नाम) द्या,’ असा टोला लगावत खंडपीठाने २६ फेब्रुवारीला शेलार, अळवणी आणि गुंजाळ यांना ‘नाम’ फाउंडेशनच्या नावे डीडी तयार ठेवण्याचे निर्देश दिले. ‘न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास सहा महिने कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात येते. त्यापेक्षा दंड भरणे, हे चांगले आहे. तुम्ही (पक्ष कार्यकर्ते) होर्डिंग आणि फ्लेक्ससाठी पाच-सात हजार रुपये खर्च करता. त्यामुळे ते पैसे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी द्या. अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या होर्डिंग लावणाऱ्यांना आमचा स्पष्ट संदेश जाऊ द्या. जेणेकरून कोणीही ही चूक पुन्हा करणार नाही,’ असे खंडपीठाने म्हटले.