शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

छोट्या व्यावसायिकांवर उपासमारी

By admin | Updated: August 3, 2016 02:40 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदपथावरील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदपथावरील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत वर्षानुवर्षे व्यवसाय करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर राहत्या घरातच बाहेरच्या बाजूला छोटेखानी व्यवसाय करणाऱ्यांवरही गंडांतर आले आहे. त्यामुळे दैनंदिन विक्रीवर पोट असलेल्या शहरातील हजारो छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पदपथ आणि ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करून महापालिकेने पदपथ आणि रस्ते नागरिकांसाठी खुले केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे. फेरीवाल्यांबरोबरच बैठ्या घरांच्या तळमजल्यावर चालणाऱ्या पानाच्या टपऱ्या, वडापाव सेंटर, किराणा मालाचे दुकान, स्टेशनरी, भाजी विक्रेते आदी छोट्या व्यवसायांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी उत्पन्नाचे स्रोत म्हणून आपल्या बैठ्या घरांचे वाढीव बांधकाम करून तळमजल्यावर व्यवसाय सुरू केले आहेत. त्यावरच अनेकांचे घर चालते. मुलांचे शिक्षण होत आहे. अशा परिस्थितीत महापालिका आयुक्तांनी निवासी गाळ्यात सुरू असलेले हे सर्व व्यवसाय बंद करण्याचे फर्मान सोडल्याने शेकडो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, घणसोली, ऐरोली या भागात अल्प उत्पन्न घटकांसाठी सिडकोने मोठ्याप्रमाणात बैठी घरे बांधली आहेत. गेल्या काही वर्षांत या बैठ्या घरांचे अनियोजितरीत्या वाढीव बांधकाम करण्यात आले आहे. तळमजल्याचा वापर छोटेखानी व्यवसायासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणत्याही बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र नाही. तसेच निवासी जागेत विनापरवाना व्यवसाय करता येत नाही. ही वस्तुस्थिती असतानाही महापालिका प्रशासनाने मागील वीस वर्षे या प्रकाराकडे कानाडोळा केला. त्याचा परिणाम म्हणून शहरात उपर मकान, निचे दुकान ही प्रवृत्ती बळावली. निवासी जागेत व्यवसाय करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, ही बाबच शहरवासीयांच्या विस्मृतीतून गेली. परंतु उशिरा का होईना, महापालिकेला नियमांची जाणीव झाली आहे. आयुक्तपदाची धुरा स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी सर्वप्रथम वर्षानुवर्षे चालणाऱ्या या नियमबाह्य गोष्टींना लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पदपथावरील फेरीवाल्यांसह निवासी जागेत व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा बजावून व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यवसाय करायचा असेल तर सर्वप्रथम जागेचा चेंज आॅफ युज करून घेण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत. >महापालिकेच्या या भूमिकेमुळे वर्षानुवर्षे निवासी जागेत छोटेखानी व्यवसाय करून आपला परिवार चालविणाऱ्या शेकडो मध्यमवर्गीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने यासंदर्भात निश्चित धोरण तयार करून दिलासा द्यावा, अशी मागणी या व्यावसायिकांकडून होत आहे.