शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर-हवेलीतून नाच-गात देहू-आळंदीकडे निघाले शेकडो वारकरी

By admin | Updated: June 28, 2016 01:37 IST

पुणे-नगर रस्ता आज भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.

लोणीकंद :बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल ।करावा विठ्ठल जिवेभावी ।।हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा।।पुण्याची गणना कोण करी ।।पुणे-नगर रस्ता आज भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता. अभंग, गौळणी, भजन गात वारकरी भगव्या पताका खांद्यावर घेऊन महिला भाविक तुळस डोक्यावर घेऊन नाचत- गात आळंदी-देहूकडे वाटचाल करत होते.शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीच्या शेकडो वारकऱ्यांनी भीमा नदी ओलांडून हवेली तालुक्यात प्रवेश केला. पेरणे फाटा येथे विसावा घेतला, तर टोलनाका येथे दुपारची विश्रांती घेतली. दिंडीचे अध्यक्ष पोपटराव शिवले, उपाधयक्ष रमेश भंडलकर, दिलीप ढेरंगे, हनुमंत शिवले, बाळासाहेब कंद, मानद सचिव काळूराम गव्हाणे, विवेक ढेरंगे, केशव फडतरे यांनी उत्तम संयोजन केले. सुमारे ५०० स्त्री-पुरुष वारकरी सहभागी झाले होते. पेरणे फाटा येथे अशोक भोंडवे, टोलनाका येथे प्रा. गोरख वाळके, मच्छिंद्र वाळके यांनी अन्नदान केले. सेवादलाचे तालुका अध्यक्ष नारायण फडतरे, बबुशा ढेरंगे यांच्या हस्ते अन्नदात्याचा सत्कार करण्यात आला.शिरूर हवेली प्रासादिक दिंडी सोहळा सलग ३० वर्षे चालू आहे. दिंडीतील भाविकांचा तंबूमध्ये मुक्काम आणि दोन वेळा भोजनाची व्यवस्था दिंडीतर्फे करण्यात येते. लोणीकंद, वढू खुर्द, कोरेगाव भीमा, वढू बु., आपटी, डिंग्रजवाडी गावातील भाविकभक्त सुमारे एक हजार सहभागी होतात.‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष करीत गुरुदेव दत्त भजनी मंडळाने आगळीवेगळी शोभा आणली. मंडळाचे हे दुसरे वर्ष असून, २५ महिला भाविकांनी एकाच रंगाची साडी नेसून डोक्यावर तुळस आणि गळ्यामध्ये टाळ, मुखी भगवंताचे नाम या मुळे सर्व सोहळ्यात लक्ष वेधून घेत होते. सुवर्णा ढेरंगे, भाग्यश्री गोसावी, राजश्री गोसावी, मंजुळा गव्हाणे, अश्विनी सव्वासे, भारती फडतरे आदींनी या मंडळाचे सुरेख नियोजन केले.राजमाता अहिल्याबाई होळकर प्रासादिक दिंडी यांचे पेरणेफाटा येथे आगमन झाले. लोणीकंदचे माजी सरपंच श्रीकांत कंद यंनी वीणापूजन केले. पंढरीनाथ पठारे, सौ. विमल पठारे, उत्तमराव भोंडवे, गजानन कंद आदी उपस्थित होते.>सकाळी पेरणे गाव (ता. हवेली) येथील विठ्ठल मंदिरात सर्व वारकरी जमले. दिंडीप्रमुख वीणेकरी बबनराव वाळके पाटील यांच्या हस्ते वीणापूजन करून दिंडीने प्रस्थान ठेवले. समारे २०० वारकरी सहभागी झाले होते.यामध्ये पेरणे, बकोरी प्रासादिक दिंडीमधील शेकडो वारकरी उत्साहाने रवाना झाले.संगमेश्वर प्रासादिक दिंडी तुळापूर दिंडीने संगमेश्वर मंदिरामधून हरिनामाच्या गजरात येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. दिंडी अध्यक्ष काळूराम शिवले, उपाध्यक्ष पोपटराव शिवले यांनी पुढाकार घेऊन ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या संगमेश्वर नावाने दिंडी सुरू केली. हे पाचवे वर्ष असून, सुमारे १०० वारकरी सहभागी झाले.