शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

दीडशे गावांचा संपर्क तुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 04:39 IST

दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदी व एटापल्ली तालुक्यात आलदंडी

अमरावती/गडचिरोली : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदी व एटापल्ली तालुक्यात आलदंडी नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने १५० गावांचा संपर्क तुटला आहे.भामरागडजवळ असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची कमी आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली. शनिवारी दुपारच्या सुमारास या पुलावर दोन ते अडीच फूट पाणी होते. त्यामुळे भामरागडसह जवळपास १०० गावांचा संपर्क तुटला आहे. अहेरीजवळच्या गडअहेरी नाल्यावरही अत्यंत कमी उंचीचा पूल आहे. या पुलावरून पाणी वाहत असल्याने तालुक्यातील देवलमरी, कोत्तागुडम, पुसूकपल्ली, संड्रा, चेरपल्ली, आवलमरी, व्यंकटरावपेठा, इंदाराम, आकनपल्ली, काटेपल्ली, कोलपल्ली, कर्नेली, लंकाचेन, वट्रा, चिन्नावट्रा, पेदावट्रा आदी २० गावांचा संपर्क तुटला आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी नदी पुलावरून ७ ते ८ फूट पाणी वाहत असल्याने सुरजागड परिसरातील ७० गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूरच्या कोरपना-परसोडा, नागभीड-जनकापूर, मोहाडी-वासेरा, तळोधी-गांगलवाडी या मार्गांवरील पुलांवर पाणी असल्याने बंद आहेत. सावली तालुक्यात पाच मार्ग बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात तुमसर, साकोली व लाखनी या तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)१२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीयवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा मध्यम प्रकल्प व रूई लघू प्रकल्प अतिवष्टीमुळे ओव्हर फ्लो झाला आहे. यवतमाळला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयाच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ९ तर अमरावती जिल्ह्यात ३ तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. मागील २४ तासांत सर्वाधिक ७२.८ मि.मी. पाऊस यवतमाळ जिल्ह्यात पडला. याशिवाय अमरावती ५८.६, अकोला १७.५, बुलडाणा ५.८, वाशीम जिल्ह्यात २३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शेती पाण्यात, वाहतूक खोळंबलीअमरावती विभागातील बुलडाणा वगळता अन्य चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातील धामनगाव आणि चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टीमुळे किमान २ हजार हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. शुक्रवारी रात्री वर्धा नदीला पूर आल्याने मध्य प्रदेशात जाणारी वाहतूक ४ तास खोळंबली होती.