शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजारांवर मंदिरे, प्रार्थना स्थळे अवैध

By admin | Updated: January 11, 2015 00:55 IST

शहरात पदपथ व रस्त्यांच्या कडेला १५२१ विविध धर्मांची व पंथाची मंदिरे तसेच प्रार्थना स्थळे आहेत. यातील नियमित व अनियमित स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. १७ स्थळांना जैसे थे

सुनावणी आटोपली : हटविण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरूनागपूर : शहरात पदपथ व रस्त्यांच्या कडेला १५२१ विविध धर्मांची व पंथाची मंदिरे तसेच प्रार्थना स्थळे आहेत. यातील नियमित व अनियमित स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. १७ स्थळांना जैसे थे ठेवून १५०४ स्थळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्याची कारवाई हाती घेतली जाणार आहे. अवैध धार्मिक स्थळे पाडण्याची जबाबदारी महापालिका व पोलीस प्रशासनाची आहे. शहरातील रस्त्यांच्या कडेला वा पदपथावर मंदिरे, मशिदी व ख्रिस्ती धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. अशी स्थळे प्रामुख्याने हटविण्यात येणार आहेत. न्यायालयाने दोन वर्षापूर्वी अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहरातील अवैध धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात १५२१ धार्मिक स्थळे पदपथ वा रस्त्यांच्या कडेला असल्याचे आढळून आले होते. धार्मिक स्थळाचे अवैध निर्माण कार्य झालेली जागा ज्या विभागाची असेल त्यांना व निर्माण कार्य करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यावर १५ दिवसात सपष्टीकरण मागवून त्यावर सुनावणी घेण्यात आली. समितीच्या शिफारसीनुसार १७ धार्मिक स्थळे आहेत, त्या स्थितीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उर्वरित १५०४ स्थळे हटविण्याची शिफारस केली आहे. मनपा व पोलीस विभागाची जबाबदारीशहरातील अवैध बांधकाम असलेली धार्मिक स्थळे हटविण्याची जबाबदारी महापालिका व पोलीस विभागाची आहे. तर ग्रामीण भागात जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाची आहे. शहरातील अवैध स्थळे हटविण्यासाठी मनपाच्या झोन स्तरावर कारवाई केली जाणार आहे. झोन कार्यालयांनी अशा स्थळांची यादी तयार केली आहे. धार्मिक स्थळांचे दोन गटात वर्गीकरणशहरातील फुटपाथ वा रस्त्यांच्या कडेला १५२१ धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांचे निर्माण करण्यात आले आहे. त्यांचे ‘अ’ व ‘ब’ अशा दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. अ वर्गात १७ स्थळांचा समावेश असून ती जैसे थे ठेवली जाणार आहे. ब वर्गात समावेश असलेली १५०४ स्थळे हटविली जाणार आहेत.शहर व ग्रामीण स्तरावर दोन समित्याअवैध मंदिरे व प्रार्थना स्थळे हटविण्यासंदर्भात शहरात महापालिका आयुक्त यांच्या तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठित करण्यात आल्या आहेत. यात नासुप्र, महावितरण, रेल्वे, डिफेन्स, विद्यापीठ, महसूल यासह ज्या-ज्या विभागाच्या जागेवर अवैध निर्माण करण्यात आले आहे, अशा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.आदेशानुसार कारवाई सुरू उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर शहरातील अवैध धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई सुरू आहे. संबंधितांना नोटीस बजावून सुनावणी घेण्यात आली आहे. अ आणि ब अशी स्थळांची वर्गवारी करण्यात आली आहे. अ वर्गातील १७ स्थळे कायम ठेवून ब वर्गातील १५०४ स्थळे पाडली जाणार असल्याची माहिती मनपाचे स्थावर अधिकारी डी.डी. जांभुळकर यांनी दिली.