शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

निवडणुकीत कोट्यवधी, मग देश ‘कॅशलेस’ कसा?

By admin | Updated: February 19, 2017 02:21 IST

आजघडीला भाजपा निवडणुकीत कोट्यवधी रुपये ओतत आहे. मग भारत कॅशलेस कसा? थापा मारण्यासही काही मर्यादा असतात. मागील २५ वर्षांत युती राहून या पक्षांनी काय केले?

मुंबई : आजघडीला भाजपा निवडणुकीत कोट्यवधी रुपये ओतत आहे. मग भारत कॅशलेस कसा? थापा मारण्यासही काही मर्यादा असतात. मागील २५ वर्षांत युती राहून या पक्षांनी काय केले? याबाबत कोणीच काहीच बोलत नाही. आम्ही नाशिकचा विकास केला. मात्र हे लोक विकासावर बोलत नाहीत, असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपासह शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. दादरच्या कबुतरखान्याजवळ सभेत राज ठाकरे यांचे आक्रमक भाषण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे आणि नाशिक येथे सभा झाली. येथील दोन्ही सभांत लोक उपस्थित असले तरी पारदर्शी कारभारामुळे मुख्यमंत्र्यांनी ते दिसले नसतील, असा चिमटा काढत त्यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली. राज पुढे म्हणाले, २५ वर्षे तुम्ही सत्तेवर आहात. मात्र कोट्यवधी रुपये कुठे गेले? याचे उत्तर तुमच्याकडे नाही. मुंबईसमोर आरोग्याचा प्रश्न उभा आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत सेवा-सुविधा नाहीत; आणि खासगी रुग्णालयांचे मात्र पेव फुटले आहे. खासगी रुग्णालयात पैसे उकळले जातात. मात्र यांना त्याचे काहीच नाही. महापालिकेच्या नोकर भरतीसाठी बाहेरील माणसे येतात. सत्ता शिवसेना-भाजपाची आणि कंत्राटदार मात्र बाहरेचे. नाशिकचा मुद्दा घेत माझ्यावर टीका केली जात. पण महापालिका निवडणूक आणि काद्यांचा भावाचा काय संबंध? कशाचाही संबंध कुठेही जोडला जातो. शिवसेना-भाजपाने आतापर्यंत काहीही केलेले नाही. परिणामी त्यांना होर्डिंग्जची गरज भासत आहे. दोघांचा डोळा महापौरांच्या बंगल्यावर, मुंबईतील जमिनींवर आहे. सगळे मिळवण्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर केला जातोय. विकासकांना जागा मिळतात मग स्मारकाला जागा का मिळत नाही? स्मारकच करायचे असेल ना तर नाशिकला या, मी करून दाखवतो स्मारक. तिकडे बेहरामपाड्यात पाच मजली झोपड्या उभ्या राहिल्या. लोक तेथे आता जाऊ शकत नाही. तुम्ही फक्त हिंदुत्त्वाचा मुद्दा घेता मग असे मोहल्ले कसे उभे राहतात. मेट्रोच्या कारशेडसाठी वाद उभा राहतो. मात्र दुसरीकडे जमिनीच्या जमिनी गिळंकृत होत असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)जाहिरांतीवर पैसा ओतलामुंबईत जाहीरनामे आणणार नाही. कारण हे वेळ दडवण्यासारखे आहे. याबाबत कोणी प्रश्न विचारत नाही मग जाहीरनामा प्रसिद्ध तरी का करायचा. गेल्या दहा दिवसांत भाजपा आणि शिवसेनेच्या वर्तमानपत्रातील जाहिरात बघा. किती पैसा ओतला आहे ते समजेल, असेही ते म्हणाले.