शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
4
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
5
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
6
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
7
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
8
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
9
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
10
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
11
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
12
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
13
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
14
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
15
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
16
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
17
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
18
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
19
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

धान्यांच्या शेकडो पोत्यांचा काळाबाजार

By admin | Updated: June 9, 2016 01:54 IST

मोरगाव भागातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दुकानदार स्वत:चे उखळ पांढरे करून घेत आहेत

मोरगाव : मोरगाव भागातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दुकानदार स्वत:चे उखळ पांढरे करून घेत आहेत. दुकानांना धान्य कोटा मिळाल्यानंतर महिनाभर धान्य देण्याची सक्ती असूनही ‘वाटप मुदत संपली’ या नावाखाली शेकडो पोत्यांचा काळाबाजार येथे होत आहे.स्वस्त धान्य दुकानांमधून राष्ट्रीय अन्न व सुरक्षा कायद्यानुसार अल्प दरात, भूमिहीन, दारिद्य्ररेषेखालील बीपीएल धारकांना गहू, तांदूळ, रॉकेल, साखर दिले जाते. मात्र, ज्या उद्देशासाठी नवीन अन्नसुरक्षा कायदा झाला, तो उद्देश बाजूला राहून स्वस्त धान्य दुकाने मलिदा खाण्याची ठिकाणे झाली आहेत. मोरगाव येथे अधिकृत रेशन कार्डधारकांना रेशनिंग मिळत नाही. बोगस कार्डधारकांना रेशन मिळत असल्याची तक्रार आहे. कोटा आल्यानंतर पोत्यात माल कमी भरला असल्याचे व वरिष्ठांनाही पैसा पुरवावा लागतो, हे कारण देऊन रेशन कमी देऊन शिल्लक माल काळ्याबाजाराने परिसरातील दुकानदारांना विकण्यात येत आहे.महिन्याकाठी हजारोंची माया दुकानदार अशा रीतीने कमवत आहेत. काळ्याबाजारात जाणारा रेशनचा माल मोरगाव येथे सापळा रचून पकडल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र, तालुक्यातील यामध्ये सापडलेल्या व्यक्तींना लगेच जामीन मिळतो. सर्वसामान्यांच्या पोटचा घास हिरावणाऱ्या या मुजोरांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे, अशी मागणीही रेशनकार्ड धारकांनी केली आहे. (वार्ताहर)>दक्षता समित्या नामधारी काळाबाजार रेशनिंगमध्ये परिसरातील गावकामगार तलाठ्यांचा सहभाग असल्याने गावोगावच्या दक्षता कमिट्या नामधारी आहेत. यामुळे तहसीलदारांनी लक्ष घालावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.