शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी मेली!

By admin | Updated: May 13, 2017 02:12 IST

अपघातानंतर दोन दुचाकींनी पेट घेतला आणि त्यात दोघेही दुचाकीस्वार होरपळू लागले. त्यांना मदत करण्याऐवजी काही प्रत्यक्षदर्शी फोटो काढण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अपघातानंतर दोन दुचाकींनी पेट घेतला आणि त्यात दोघेही दुचाकीस्वार होरपळू लागले. त्यांना मदत करण्याऐवजी काही प्रत्यक्षदर्शी फोटो काढण्यात आणि व्हिडिओ शूटिंग करत असल्याचा प्रकार घटनेच्या दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी सायंकाळी माजलगावकडून अवैध दारू घेऊन जाणाऱ्या दुचाकीची परभणीकडून येणाऱ्या दुचाकीशी घळाटवाडी फाट्यावर टक्कर झाली. त्यात दारूच्या बाटल्यांचा स्फोट होऊन दोन्ही दुचाकींनी पेट घेतला. दुचाकीखाली अडकलेल्या व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. त्याची ओळख दुसऱ्या दिवशीपर्यंत पटली नव्हती. तर, दुसरा दुचाकीस्वार नितीन अजयकुमार जैस्वाल (२२, रा. माजलगाव) ७० टक्के भाजला. जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. आग भडकत गेल्याने त्यांना वाचविता आले नाही, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. असाच प्रकार अहमदनगरमधील बोटा परिसरात घडला. तिथे आंब्यांनी भरलेली एक पिकअप व्हॅन उलटली आणि चालकाला वाचविण्याआधी रस्त्यावर पसरलेले आंबे घेऊन जाण्यासाठी लोकांनी धाव घेतली.