शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शहराला लाभणार ‘एचपी’चे तंत्रज्ञान

By admin | Updated: July 20, 2016 04:22 IST

तांत्रिक साहाय्य देण्याच्या दृष्टीने संगणक क्षेत्रातील एचपी एंटरप्रायजेस या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली

ठाणे : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महत्त्वाच्या घटकांसाठी तांत्रिक साहाय्य देण्याच्या दृष्टीने संगणक क्षेत्रातील एचपी एंटरप्रायजेस या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. या वेळी स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकल्पांना तांत्रिक आणि वित्तीय साहाय्य देण्याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली. या बैठकीत पाणीपुरवठा, महिला व मुलांची सुरक्षितता, घनकचरा व्यवस्थापन, वाय-फाय सिटी आदी महत्त्वाच्या घटकाविषयी चर्चा झाली.एचपी या आंतरराष्ट्रीय कंपनीने पाणीपुरवठा, नागरी सुरक्षितता, नागरी गरिबीचे उच्चाटन करणे, सरकार ते नागरिक कनेक्टिव्हिटी, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य यंत्रणा, नागरी सुविधा याबाबत आवश्यक ते तांत्रिक साहाय्य पुरवण्याबाबत आपली सहमती दर्शवली. तसेच आवश्यकता पडल्यास काही स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सुलभ अर्थसाहाय्य देण्यात येईल, असे स्पष्ट केले. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ दिवसेकर, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, एचपीई फ्युचर सिटीजचे भारतातील प्रमुख आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख एम. लक्ष्मीनारायण राव, कण्ट्री सेल्स मॅनेजर कमल कश्यप, बिझनेस हेड रवींद्र रानडे, एचपी फायनान्शियल सर्व्हिसेसचे सचिन देशमुख, उपायुक्त संजय निपाणे, संदीप माळवी, अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महापालिका आयुक्तांनी या वेळी उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्षात कशा पद्धतीने अंमलबजावणी करता येईल, याचे कंपनीच्या वतीने सादरीकरण केल्यानंतर लगेचच सामंजस्य कराराची प्रक्रि या पूर्ण करता येईल, असे सांगितले. स्मार्ट सिटीअंतर्गत एचपी या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या तंत्रज्ञानाचा ठाणे शहरासाठी निश्चितपणे उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.