शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

हावडा ते नागपूर प्रवासाचे तिकीट

By admin | Updated: September 22, 2014 00:54 IST

बॅगची तपासणी केली असता प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना ४ नोटांचे बंडल आढळले. यात एका बंडलात १ हजाराच्या १४९ नोटा म्हणजे १ लाख ४९ हजार रुपये होते. दुसऱ्या बंडलमध्ये वरच्या बाजूला १ हजाराची

नागपूर : बॅगची तपासणी केली असता प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना ४ नोटांचे बंडल आढळले. यात एका बंडलात १ हजाराच्या १४९ नोटा म्हणजे १ लाख ४९ हजार रुपये होते. दुसऱ्या बंडलमध्ये वरच्या बाजूला १ हजाराची नोट आणि खाली नोटाच्या आकाराची पेपरची रद्दी आणि झेरॉक्सचे नोटाच्या आकाराचे कोरे कागद होते. दुसऱ्या बंडलमध्ये वर ५०० ची नोट आणि खाली नोटाच्या आकाराचे कोरे कागद, तिसऱ्या बंडलमध्ये वर १ हजाराची नकली नोट, खाली ५०० रुपयाची नकली नोट आणि मध्ये नोटाच्या आकाराचे कोरे कागद होते. दरम्यान आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी अमजद खान जवळ ६३ हजार रुपये रोख, निर्मल ते नागपूर बस प्रवासाचे तिकीट, समीरनजवळ १ हजार ५०० रुपये, हावडा ते नागपूर प्रवासाचे जनरल तिकीट आणि दोन मोबाईल आढळले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी पुरुषोत्तम बाडीवाले, गोपाल यादव, एलसीबीचे निरीक्षक रमेश तायडे, सहायक पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार वानखेडे, उपनिरीक्षक आनंद मेश्राम, नरेंद्र चौधरी, विजय तायवाडे, गौतम शिरसाठ, विराज मते, जितेंद्र लोखंडे, भूपेश धोंगडी यांनी पार पाडली.(प्रतिनिधी)आॅटो विकून आणले पैसेप्रकरणात अटक करण्यात आलेला निर्मल आंध्रप्रदेश येथील आरोपी अमजद खान याची ओळख आरोपी समीरन आणि त्याच्या मित्राशी मोबाईलवर झाली. असली नोटा घेऊन नकली नोटा घेण्याचा त्यांचा मोबाईलवर व्यवहार झाला. त्यानंतर आदिलाबादला भेटून नागपूरला येण्याचा बेत त्यांनी आखला. ठरल्याप्रमाणे अमजदने आपला आॅटो विकून त्यातून आलेले ६३ हजार रुपये घेऊन आला होता. त्या मोबदल्यात ६ लाखाच्या नकली नोटा नेऊन त्या चलनात आणायच्या असा त्याचा बेत होता. परंतु त्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.