शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? याचा भाजपाने विचार करावा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 24, 2016 18:52 IST

कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच या गोष्टीवर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला

ऑनलाइन लोकमत

नाशिक. दि. २४ - कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच या गोष्टीवर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक येथील कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला. 

भविष्यात युती करायची की नाही, हे शिवसेनाच ठरवेल, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपवर जोरदार टीका केली. तसेच, सत्तेसाठी नव्हे, हिंदुत्वासाठी युती केल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, ह्लभाजपला उत्तर देण्यासाठी मेळावा घेतला आहे का?ह्व तर यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ह्लछोट्या गोष्टींसाठी वाघांना बोलवण्याची गरज नाही.ह्व अशाप्रकारे उद्धव यांनी भाजपवर निशाणा साधला. ह्लमी सरकारच्या विरोधात नाही, जनतेच्या मनातलं बोलतोह्व असे सांगायलाही उद्धव विसरले नाहीत.तमाम महाराष्ट्र तेव्हाच शिवसेनेच्या मागे उभा राहिला असता, तर आज चित्र वेगळं दिसलं असतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय,  भविष्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल अशी खात्री उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्तवाद आम्हाला मान्य असून, त्यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणीही उद्धव यांनी यावेळी केलीठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे: > शिवसेनेला रस्त्यावर उतरायला लागते, कारण केंद्र सरकारवर टीका होते. उत्तराखंड प्रकरणातही अशीच टीका झाली. मित्र म्हणून मित्राला सावध करणे आमचे काम आहे. > युती आहे काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही. युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर होती. परंतु तोही मुद्दा मागे पडला आहे. हिंदुत्त्वाचा मुद्दा मागे पडला तर भाजपसोबत युती करणार नाही, भविष्यात युती करायची की नाही, हे कार्यकर्ते ठरवतील. > तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची? म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मित्राला सावध केले. > दुष्काळावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे > कन्हैयाचा जन्म कसा झाला? याचा विचार कारावा. युवकांना देशद्रोह ठरवल्यावर युवकांनी काम कसे करावे? > लहान राज्ये कशासाठी? राष्ट्रपती राजवट लागू करायला? > नाशिक मेळाव्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे होणार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार.⁠⁠