चौघींचा विनयभंग; एकीवर बलात्कार : एकाच दिवशी गुन्हे दाखल नागपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याच्या चार घटना विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. तर, शनिवारी गिट्टीखदानमध्ये एका १२ वर्षाच्या मुलीवर शेजारच्या तरुणाने बलात्कारही केला. यामुळे समाजमन चिंतीत झाले आहे. सीताबर्डी, पाचपावली आणि कळमन्यात तसेच गिट्टीखदानमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. विनयभंगाच्या चारपैकी तीन घटना दिवसाढवळ्या घडल्या, हे विशेष!नंदनवनमधील रहिवासी संदीप धुर्वे (वय २६) हा शनिवारी सकाळी ११.३० वाजता सीताबर्डीतील एका घरात शिरला. त्याने घरात झोपून असलेल्या ११ वर्षीय मुलीचे पांघरूण ओढून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यामुळे शेजारची मंडळी धावून आली. त्यामुळे पुढची घटना टळली. सीताबर्डी पोलिसांनी आरोपी संदीप धुर्वे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.लालगंज जुन्या पोस्ट आॅफिससमोर राहणारा आरोपी सचिन दिलीप खापे (वय १९) १ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता पाचपावलीतील एका घरात शिरला. त्याने १५ वर्षांच्या मुलीचे टी-शर्ट ओढून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने तिला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपी सचिनविरुद्ध विनयभंग तसेच धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली. ३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५.३० वाजता देवराव गजाम हा पीडित मुलीच्या (वय १५) घरात शिरला. त्याने तिला पिण्याचे पाणी मागितले. ती पाठमोरी होताच आरोपीने तिला मिठी मारली. तिने विरोध केला असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी गजामविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्याचा शोध घेतला जात आहे. चवथीही घटना कळमन्यातीलच आहे. १८ वर्षीय तरुणी शनिवारी रात्री १० वाजता आपल्या घरातील वरच्या खोलीत अभ्यास करीत होती. आरोपी विनोद जांगडे याने तिच्या घरात जाऊन आधी काम केलेले फर्निचर पाहण्याचा बहाणा केला. त्यानंतर आरोपीने युवतीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्यानंतर आरोपी पळून गेला.
मुली किती सुरक्षित ?
By admin | Updated: February 9, 2015 01:05 IST